‘ तु काय करणार, आम्हीच तुला आपटू...; दुबेंच्या टीकेला अजित पवारांच्या रणरागिणीचं जशास तसं उत्तर
Three Language Policy : “तुमची ही भाषा झारखंडमध्ये वापरा, महाराष्ट्रात नाही. मराठी माणूस का बाहेर पडेल? तो जेव्हा दुसऱ्या राज्यात काम करतो, तेव्हा ती त्याची कर्मभूमी असते. अमराठी लोकांनीही महाराष्ट्रात यावं, पण मराठी भाषा शिकावी आणि तिचा सन्मान करावा, निशिकांत दुबे हे आमच्या मित्रपक्ष भाजपचे खासदार असले तरी त्यांनी मराठीबद्दल अश्लाघ्य भाषेत बोलू नये,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी इशारा दिला आहे.
हिंदी भाषेच्या सक्तीकरणाविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच हिंदी भाषा सक्ती करू नये असे आवाहनही केले. त्यांतर भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकाही केली. निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंना तर थेट धमकीच दिली.
“म्हणून हे फडतूस कॅरेक्टर बोलू लागतात…; भाजप खासदार निशिकांत दुबेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “ठाकरे बंधू घाणेरडं राजकारण करत आहेतजर तुम्ही खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असाल, तर माहीम दर्ग्यावर जा आणि तेथील उर्दू भाषिकांवर कारवाई करून दाखवा. तुमच्या घरात सिंह आहे म्हणता, मग हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात या. महाराष्ट्राबाहेर पडा, आम्ही तुम्हाला आपटून आपटून मारू आणि दाखवून देऊ.” अशा शब्दांत इशाराच दिला. दुबे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे यांनी निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रुपाली ठोंबरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “दुबे हे आमच्या मित्रपक्ष भाजपचे खासदार असले तरी त्यांनी मराठीबद्दल अश्लाघ्य भाषेत बोलू नये,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, “तुमची भाषा झारखंडमध्ये वापरा, महाराष्ट्रात नाही. मराठी माणूस का बाहेर पडेल? तो जेव्हा दुसऱ्या राज्यात काम करतो, तेव्हा ती त्याची कर्मभूमी असते. अमराठी लोकांनीही महाराष्ट्रात यावं, पण मराठी भाषा शिकावी आणि तिचा सन्मान करावा,” असं ठोंबरे यांनी म्हटलं.
त्याचबरोबर, “बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करावी. भाजपच्या खासदारांना लगाम घालावा. आणि जर ते शक्य नसेल, तर बिस्तर उचला आणि निघा,” अशा कठोर शब्दांत ठोंबरे यांनी संताप व्यक्त केला. “तू काय आपटून मारशील? तुला आम्ही आपटून दाखवू, तुम्ही झारखंडचे आहात तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीही बोलू शकतात. अशा प्रवृत्तींचा तीव्र निषेध केला पाहिजे. इथे येऊन काम करायचं आणि नंतर मराठी माणसांविरुद्धच बोलायचं, हे खपवून घेतलं जाणार नाही,” असं ठोंबरे म्हणाल्या.
तसंच, “बाहेरून येणाऱ्यांनी मराठी भाषेचा सन्मान केला पाहिजे. महाराष्ट्रात राहायचं, तर मराठीची अस्मिता जपली पाहिजे. दुबे यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा महाराष्ट्रात आल्यास जनतेकडून तीव्र प्रतिक्रीया मिळू शकते,” असा इशाराही त्यांनी दिला.