Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे अल्पशा आजाराने निधन, काँग्रेसला मोठी हानी

काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आणि भोर मतदारसंघाचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी येत आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून अल्पशा आजाराने त्यांचे निधन आल्याचे समजत आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 04, 2026 | 08:41 PM
Veteran Congress leader Anantrao Thopate dies, Anantrao Thopate dies, Congress,

Veteran Congress leader Anantrao Thopate dies, Anantrao Thopate dies, Congress,

Follow Us
Follow Us:

काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आणि भोर मतदारसंघाचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी येत आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याचे समजत आहे. त्यांनी गेली अनेक वर्षे भोर मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालायत त्यांच्यावर उपचार चालू असताना रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनंतराव थोपटे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

अनंतराव थोपटे यांची ओळख काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून होती. पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघात त्यांचा दबदबा होता. पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदार होते. अनेक वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. अनेक वर्षे राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी पद भूषवले होते. पुण्याचे पालकमंत्रीपद देखील त्यांनी भूषवले होते. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यात अनंतराव थोपटे यांचे मोठे योगदान होते. भाजपचे नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांचे ते वडील होते.

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघाचे आधारस्तंभ अनंतराव थोपटे यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनंतराव थोपटे हे वयोपरत्वे उद्भवलेल्या व्याधींमुळे आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा आमदार संग्राम थोपटे, सुन जिल्हा परिषद सदस्या स्वरुपा थोपटे, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अनंतराव थोपटे यांची कारकीर्द ही संघर्षातून आणि लोकसेवेतून आकाराला आली होती. त्यांच्या कार्याचे काही महत्त्वाचे पैलू म्हणजे सलग सहा वेळा भोर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी या भागाचा कायापालट केला. दुर्गम भागात रस्ते, पाणी आणि शिक्षणाची गंगा पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी दुग्धविकास, पशुसंवर्धन, फलोत्पादन आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्या काळात घेतलेले अनेक निर्णय आजही पथदर्शक मानले जातात.

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जेव्हा काँग्रेसला खिंडार पडले होते, तेव्हा अनंतराव थोपटे हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी काँग्रेस विधिमंडळ गटनेते म्हणून अत्यंत संयमाने आणि आक्रमकपणे पक्षाची धुरा सांभाळली. राजगड सहकारी साखर कारखाना आणि राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात ज्ञानगंगा घरोघरी पसरवत युवकांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च, संजय राऊत यांचे महायुती सरकारवर गंभीर आरोप

अनंतराव थोपटे हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि प्रशासनावरील पकडीसाठी ओळखले जात. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्याच्या नियोजन आराखड्याला नवी दिशा दिली. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न विधानसभेत मांडताना त्यांच्या अभ्यासू मांडणीचा दरारा विरोधकारही असायचा. ​अनंतराव थोपटे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भोर येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार असून, त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या निधनामुळे भोर तालुक्यात सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

​काँग्रेस पक्षाने एक असा नेता गमावला आहे, ज्याने प्रतिकूल परिस्थितीतही ‘निष्ठा’ काय असते, हे आपल्या कृतीतून सिद्ध केले. “अनंतराव थोपटे यांच्या निधनाने एक मार्गदर्शक हरपला आहे. त्यांनी आयुष्यभर काँग्रेस विचारधारेची जपणूक केली. भोर-वेल्हा भागाच्या विकासातील त्यांचे योगदान विसरता येणार नाही.”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला वॉर रूम बैठकीत पायाभूत सुविधा, विविध प्रकल्पांचा आढावा

Web Title: Veteran congress leader anantrao thopate dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • Congress
  • Congress leader

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
3

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’
4

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.