इंदापूर : प्रियदर्शिनी इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर या शैक्षणिक संस्थेला स्थापन होऊन ३५ वर्ष पुर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर व महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून माजी सैनिक व जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा पार पडला. संस्थेचे अध्यक्ष पी.जी. नायर व उपाध्यक्ष अब्दुलहक शेख यांच्या हस्ते माजी सैनिक व शालेय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली. भारताला हे स्वातंत्र्य कसे मिळाले. कारगील सारखं युद्ध कसे होते. या सर्व बाबींचा इतिहास विद्यार्थ्यांना माहिती व्हावा. ज्या सैनिकांनी देशांप्रती आपले कर्तव्य बजावले त्यांचा योग्य तो सन्मान व्हावा या उद्देशाने माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. जी. नायर व उपाध्यक्ष अब्दुलहक शेख यांनी दिली.
[read_also content=”तक्रादाराकडे पैसे मागणाऱ्या पोलीस हवालदाराचे निलंबन https://www.navarashtra.com/maharashtra/suspension-of-police-constable-who-demanded-money-from-takradar-nrdm-332150.html”]
सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
यावेळी माजी सैनिकांनी देश सेवा बजावत असताना आलेले कडवे अनुभव व थरारक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. मुख्याध्यापक माऊली मोकळे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.