Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यात रंगणार १५ वे विद्रोही साहित्य संमेलन; जेएनयूच्या प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांच्या हस्ते होणार उद्घाटन

साताऱ्यात १५ वे विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांची उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 22, 2026 | 09:05 PM
साताऱ्यात रंगणार १५ वे विद्रोही साहित्य संमेलन; जेएनयूच्या प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Follow Us
Follow Us:

सातारा : नवी दिल्ली येथील प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांची सातारा येथे होणाऱ्या १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्राध्यापक, भारतीय शिक्षणतज्ज्ञ, गणितज्ञ आणि आदिवासी हक्कासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आणि १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन संयोजन समितीनं उद्घाटक म्हणून एकमतानं प्रो डॉ सोनाझरिया मिंझ यांच्या नावाची निवड केल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राष्ट्रीय समन्वय समितीचे मुख्य समन्वयक डॉ भारत पाटणकर व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे अध्यक्ष कॉ धनाजी गुरव यांनी दिली.

सातारा येथे आगामी दि. ९ आणि १० मे रोजी १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्तानं साताऱ्याच्या प्रतिसरकारला अभिवादन करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय शाहीर संभाजी भगत या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे स्वागताध्यक्ष आहेत.

हिरो बनण्याच्या नावाखाली कारमध्ये ‘हे’ बदल कराल तर हमखास रद्द होईल RC, जाणून घ्या RTO चे नियम

या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नवी दिल्ली येथील प्रो डॉ सोनाझरिया मिंझ उपस्थित राहणार आहेत. त्या मूळच्या झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आहेत. मिंझ २००५ पासून जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली येथे स्कूल ऑफ कॉम्प्युटर अँड सिस्टीम्स सायन्स या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

झारखंडमधील विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून काम

प्रोफेसर सोनाझरिया मिंझ यांनी झारखंडमधील दुमका येथील ‘सिदो-कान्हू मुर्मू विद्यापीठाच्या’ कुलगुरू म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. ‘सिदो-कान्हू मुर्मू विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून प्रो डॉ सोनाझरिया मिंझ यांनी मे २०२० ते जून २०२३ मध्ये कुलगुरु म्हणून काम केलं. त्यानंतर पुन्हा जवाहलाल नेहरु विद्यापीठात रुजू होत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रो डॉ सोनाझरिया मिंझ यांची जून २०२५ मध्ये यूनेस्को: आदिवासी हक्क याच्या अनुषंगाने असलेल्या समितीच्यासह अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. हा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत असे डॉ भारत पाटणकर यांनी सांगितले.

Renault Duster, Tata Sierra की Kia Seltos, पॉवर आणि सेफ्टीत कोणती कार पुढे? खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट

प्रो डॉ. सोनाझरिया मिंझ यांनी चेन्नईत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जवाहलाल नेहरु विद्यापीठात संगणक विज्ञान विषयात एम.फिल आणि पीएच.डी. पूर्ण केली. मिंझ यांनी आयआयटी कानपूरमधून देखील पीएच.डी केली आहे. अशा या आदिवासी समाजातील उच्चशिक्षित व तरीही आदिवासी हक्कांसाठी झटणाऱ्या प्रोफेसर सोनाझरिया मिंझ यांची सातारा येथील १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून झालेली निवड ही नक्कीच विद्रोही चळवळीला बळ देणारी ठरेल असे संयोजन समितीचे अध्यक्ष ह भ प डॉ सुहास महाराज फडतरे व कार्याध्यक्ष विजय मांडके यांनी सांगितले.

Web Title: Vidrohi sahitya sammelan satara sonajharia minz inauguration jnu professor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Marathi News
  • Satara

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
3

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
4

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.