फोटो सौैजन्य: Gemini
भारतातील ट्रॅफिक नियमांनुसार कारच्या मूळ स्ट्रक्चरमध्ये कोणताही मोठा बदल करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. Supreme Court of India आणि RTO च्या कठोर आदेशांनुसार, जर केलेले बदल वाहनाच्या मजबुती किंवा सुरक्षेला धोका निर्माण करत असतील, तर त्या वाहनाचे रजिस्ट्रेशन (RC) रद्दही केले जाऊ शकते.
Royal Enfield आणतेय नवीन Himalayan 440, जाणून घ्या खास वैशिष्ट्य आणि पॉवर
कारच्या आत सीट कव्हर्स बदलणे, नवीन म्युझिक सिस्टीम किंवा टचस्क्रीन बसवणे आणि डॅशबोर्डमध्ये बदल करणे पूर्णपणे कायदेशीर आहे. तसेच, कारचा रंग बदलता येतो, मात्र त्यासाठी RTO कडून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे आणि बदल केल्यानंतर RC वर नवीन रंगाची नोंद करणे गरजेचे आहे. कारमध्ये अलॉय व्हील्स लावणे देखील कायदेशीर आहे, पण त्यांचा साइज कंपनीने दिलेल्या पर्यायांप्रमाणेच असावा.
याशिवाय, रूफ रेल्स, डोअर प्रोटेक्टर्स आणि व्हायझर्ससारखे छोटे अॅक्सेसरीज बसवू शकता. पेट्रोल कारमध्ये मान्यताप्राप्त CNG किट बसवणेही योग्य आहे, मात्र त्याची नोंद रजिस्ट्रेशनमध्ये करणे आवश्यक आहे.
Bajaj NS400Z vs KTM 390 Duke: फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक सुसाट? जाणून घ्या एका क्लिकवर






