
छत्रपती संभाजीनगर : शहरात संघ रचनेप्रमाणे असलेल्या एकूण २५ नगरांमध्ये मंगळवारी (दि.२४) पथसंचलनासह विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. घोषाच्या तालावर, संघ गणवेशात हातात दंड घेऊन संचलनातील स्वयंसेवकांनी शिस्तीचे दर्शन घडविले. संचलनाच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी रांगोळ्या काढून, पुष्पवृष्टी करत स्वागत केले. देशभक्तीपर गीतांसह थोर पुरुषांचे अमृत वचनेही कार्यक्रमात सांगण्यात आली.
उत्सवामध्ये शस्त्रपूजन म्हणून दंडाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये वक्त्यांचे व प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन लाभले. स्वयंसेवकांसह परिसरातील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. उत्सवामध्ये शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले होते. तसेच पोलीस बंदोबस्त ही चोख होता. शहर व परिसरातील आसेगाव, माळीवाडा, बजाज नगर, पडेगाव, मराठा हायस्कूल, पद्मपुरा, जिल्हा परिषद मैदान, सुराणा नगर, सूर्या पार्क एन-4, नाईक कॉलेज, कांचनवाडी, पगारिया कॉलनी, डी एस पी आय कॉलेज चाटे रोड, नाईक नगर देवळाइ, मयूरबन कॉलनी, चिमणपूर गाव, होणाजी नगर, वेणूताई चव्हाण शाळा, प्रमोद महाजन क्रिडा संकुल, हर्सूल गाव, संत तुकोबा मैदान कामगार चौक, वैशाली धाबा चौक आदी ठिकाणी हे संचलन झाले.
मल्हार नगर उत्सवातील प्रमुख पाहुण्या शिल्पा पाठक यांनी भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी आवाहन केले. गुरूगोविंदसिंग नगर येथील प्रमुख पाहुणे नवीन बागडिया यांनी संघ स्वयंसेवक हे सर्व कार्यात अग्रेसर असतात असा उल्लेख केला. इतर नगरांमध्ये प्रमुख पाहुणे मनोज बडजाते, राघवेंद्र चाकूरकर, नितीन घोरपडे, उत्तम काळवने, अमोल सावंत, प्रितेश चॅटर्जी, संतोष बनकर, विजय देसरडा, रणजित शेंडगे, अर्जुनराव गालफाडे, विकास महाजन, परभतराव जगताप, बच्चितरसिंग हरदयालसिंग घई इत्यादींचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या शिस्तीचे कौतुक प्रमुख पाहुण्यांनी केले. छत्रपती संभाजीनगर शहरात संघ दृष्ट्या असलेली एकूण २५ नगरे मिळून जवळपास २५०० स्वयंसेवक संचालनात सहभागी झाले होते. संघ प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.