Vijaysingh Bangar press conference serious allegations against walmik Karad
बीड : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुंडगिरीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगाची हवा खात आहे. मात्र वाल्मिक कराडचे अनेक कारनामे आता समोर येत आहेत. वाल्मिक कराड हा अनेक दिवस फरार देखील होता. यापूर्वी त्याने बीडमध्ये दहशत पसरवण्यासाठी अनेक गुन्हे केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. वाल्मिक कराडसोबत यापूर्वी काम करत असलेल्या त्याचा सहकारी विजयसिंह बांगर यांनी अनेक गंभीर दावे आणि आरोप केले आहेत. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व पुरावे देणार असल्याचे देखील बांगर म्हणाले आहेत.
पूर्वी वाल्मिक कराडसोबत काम करणारे विजयसिंह बांगर यांनी अनेक वाल्मिक कराडबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. वाल्मीक कराड याचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर हे वाल्मीक कराड पासून वेगळे झाल्यानंतर वाल्मीकने माझ्यासोबत काम कर असा हट्ट धरला होता. मात्र विजयसिंह बांगर यांनी त्यास नकार दिल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. आता बांगर यांनी पत्रकार परिषद घेत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ते म्हणाले की, माझ्यासमोर वाल्मीक कराडने तिघांना मारलं, त्याचा मी साक्षीदार आहे. महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मीक कराडच्या टेबलवर त्याचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच तुला एका सरपंचाच्या खुनात अडकवणार अशी वाल्मिकने धमकी दिली होती. या यासंदर्भातील सर्व पुरावे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधिक्षकाकडे देणार असल्याचे देखील विजयसिंह बांगर यांनी म्हटले आहे. यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
पुढे विजयसिंह बांगर यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये एक ऑडिओ क्लिप ऐकवली. यामध्ये वाल्मिक कराडचा आवाज ऐकवण्यात आला. यामध्ये वाल्मीक कराड एका व्यक्तीला आता सगळ्यांचीच मदत घेतो तू कोण रे कुत्रा अशा प्रकारची भाषा वापरत पुढे जातीवाचक शिवीगाळ केली आहे. बहुजन समाजातील व्यक्तीला जातीवाचक शिवी वाल्मिक कराडने दिलेली बांगर यांनी ऐकवली आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पत्रकार परिषदेमधील या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात विजयसिंग बांगर यांनी बोलताना सांगितले की एका व्यक्तीने वाल्मीक कराडकडे कामासाठी 25 लाख रुपये दिले होते. मात्र तो परत देत नसल्याने वारंवार फोन केला होता त्याचा राग आला आणि यानंतर त्याने शिवीगाळ केली, तसेच त्याला बोलावून घेऊन पाच लाख रुपये दिले आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकवले. जसे मला एका खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडनेच अडकवले होते, असाही आरोप विजयसिंग बांगर यांनी यावेळी केला आहे. ह