सासवड: जमीन आमच्या हक्काची , नाही कुणाच्या बापाची, विमानतळ प्रकल्प हद्दपार करणारच अशा घोषणा देत तब्बल आठ ते नऊ वर्षे प्रकल्पाविरोधात भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पुरंदर विमानतळ हद्दपार करण्यासाठी शुक्रवारी दि. ४ मार्च पासून सासवडच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. काही झाले तरी आता मागे हटणार नाही असा निश्चय व्यक्त करीत प्रकल्प हद्दपार झाल्यानंतर येथून उठणार आहोत. शासनला वाटल्यास आम्हाला गोळ्या घालाव्यात असे खुले आव्हान शेतकऱ्यांनी यावेळी दिले आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण अशा सात गावामध्ये शासनाने विमानतळ प्रकल्प जाहीर करून भूसंपादन प्रक्रियेला आता काही दिवसांत सुरुवात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध असतानाही शासन जमिनीवर एमआयडीसी द्वारे शिक्के मारण्याच्या तयारीत आहे. यादृष्टीने वरिष्ठ अधिकारी स्थानिक गावातील नागरिकाना भेटून त्यांचे मत परिवर्तन करण्याच्या प्रयत्नात आहे. दोन दिवसापूर्वी एखतपूर मुंजवडी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर उर्वरित गावांना भेटी देण्याचे जाहीर केले आहे.
LSG vs MI: मिशेल मार्शचा मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठा कारनामा! 10 वर्ष जुन्या विक्रमाला लावला सुरंग..
मात्र आम्हाला शासनाला जमीन द्यायचीच नाही अशी भूमिका जाहीर करून आमच्या प्रेतावरून प्रकल्प करण्याचे खुले आव्हान दिले आहे. त्यानंतर आज शुक्रवारी ४ रोजी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी सासवड येथील तहसील कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत निवृत्त शिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत आमरण उपोषण सुरु केलेआहे. पारगावच्या सरपंच ज्योती मेमाणे, कुंभारवळण च्या सरपंच मंजुषा गायकवाड, खानवडीचे सरपंच स्वप्नाली होले, एखतपूरच्या सरपंच शितल टिळेकर, चेतन मेमाणे, विकास कुंभारकर, सतीश कुंभारकर, सोमनाथ कुंभारकर, विठ्ठल मेमाणे, महादेव टिळेकर लक्ष्मण गायकवाड, रामदास होले यांच्यासह सात गावातील ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होते.
माझी साडेचार एकर जमीन असून सर्व जमीन बागायती आहे. त्यामध्ये मी सर्व पिके घेतो विमानतळ प्रकल्पात माझी सर्व जमीन गेल्यावर मी काय करू ? असा प्रश्न उपस्थित करून माझा या प्रकल्पाला विरोध असल्याचे वनपुरी येथील बबन झेंडे या शेतकऱ्याने सांगितले आहे.
ठराविक राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी सात गावांवर नांगर फिरवणार असाल तर आम्हाला ते मान्य नाही. तुम्ही जबरदस्ती करणार असाल तर आम्हाला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा मार्ग अवलंबवावा लागेल. जसा हात जोडता येतो, तसा उगारता देखील येतो असा इशारा दिला पारगाव येथील हरिभाऊ मेमाणे यांनी दिला आहे.
वनपुरी येथील तान्हुबाई कुंभारकर यांनी तीव्र असंतोष व्यक्त करताना शासनाने आमची जमीन काढून घेतल्यास कोठे जाणार ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शेती नष्ट करून प्रकल्प केल्यास शेती कुठे विमानतळावर करणार का ? ज्यांना वाटते प्रकल्प व्हावा त्यांनी आम्हाला जमीन द्यावी अशी जाहीर मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या निसर्गरम्य गावी जाऊन राहायला जसे आवडते, तसे आमचे गाव आम्हाला आवडते. त्यांनी दुसऱ्या गावांची निवड करावी, आम्ही विमानतळ होवू देणार नाही. अशी प्रतिक्रिया पारगाव येथील शुभांगी मेमाणे यांनी दिली आहे.
यावेळी पीएस मेमाणे, महादेव कुंभारकर, सोमनाथ कुंभारकर, सतीश कुंभारकर, चेतन मेमाणे यांच्या सह प्रकल्प बाधित गावातील शेतकऱ्यांनी शासनाचा जोरदार निषेध केला आहे. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत विमानतळ प्रकल्प होवू देणार नाही आणि प्रकल्प रद्द केल्याशिवाय येथून हटणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.
इंद्रायणी पुन्हा फेसाळली: आळंदीत नागरिकांच्या आरोग्याला धोका, नदीला गटारीचे प्राप्त झाले स्वरूप
शासनाने आमच्या सात गावांवर जो विमानतळ प्रकल्पाचा घाट घातला आहे तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्हाला कोणताही राजकीय, सामाजिक, आर्थिक पाठींबा नाही. मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही आंदोलन यशस्वी करून दाखवू. शासनाच्या विरोधातील उपोषण अधिक तीव्र करण्यासाठी आणि लढा यशस्वी करण्यासाठी प्रकल्प बाधित गावातील शेतकऱ्यांनी हातातील कामे सोडून उपस्थित राहून शासनाला आपली किंमत दाखवून द्यावी.’अशी प्रतिक्रीया पारगावचे शिक्षण अधिकारी पी.एस. मेमाणे यांनी दिली आहे.
पुरंदर मधील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण मधील गाव गावांतील नागरिकांनी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली आहे. दरम्यान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांच्यासह यांनी विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठींबा देवून शासनाचा जोरदार निषेध केला आहे.