मिशेल मार्श(फोटो-सोशल मीडिया)
LSG vs MI : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एलएसजीने बाजी मारली. लखनऊमधील इकाना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला 12 धावांनी धूळ चारली. या विजयासह एलएसजीचा या हंगमातील दूसरा विजय ठरला, तर मुंबईला मात्र तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. या सामनामध्ये लखनऊचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्शने चमकदार कामगिरी करून संघाला 203 पर्यंत पोहचवले. त्याने 31 चेंडूत 60 धावा केल्या. दरम्यान मार्शने एक 10 वर्ष जुना रेकॉर्ड देखील मोडला आहे.
या वर्षी लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना मिचेल मार्शने हा भीम पराक्रम केला आहे. त्याने शिखर धवनचा विक्रम मोडून मोठी कामगिरी बजावली आहे. आम्ही तुम्हाला पॉवरप्लेच्या विक्रमाबाबत सांगत आहोत. ज्याला मोडणे अशक्य मानले जाते.
हेही वाचा : LSG VS MI : मुंबई इंडियन्सचा IPL 2025 मधील तिसरा पराभव, लखनऊने घरच्या मैदानावर MI ला केलं पराभूत
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्स संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. सलामीवीर मिचेल मार्श आणि एडन मार्कराम हे फलंदाजीसाठी आले आणि त्यांनी संघाला दणक्यात सुरवात करून दिली. एडन मार्कराम सावध फलंदाजी करताना दिसून आला मात्र दुसरीकडे मिचेल मार्शने मुंबईची हवा टाईट करून ठेवली होती. त्याने 31 चेंडूत 60 धावा चोपल्या त्यामध्ये त्याने 2 षटकार आणि 9 चौकार लगावले.
सलामीवीर मार्करामला फलंदाजीची संधी मिळत नव्हती. मिचेल मार्श बहुतेक चेंडू खेळून काढत होता. पहिली सहा षटके संपली तेव्हा असे दिसून आले की 36 चेंडूंपैकी केवळ 6 चेंडू मार्करामला खेळता आले आणि उर्वरित 30 चेंडू मिचेल मार्शने खेळून काढले. यापूर्वी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता. जो आता मोडीत निघाला आहे.
हेही वाचा : IPL 2025 : कॅप्टन कूल रिटर्न! MS Dhoni सांभाळणार CSK चे कर्णधारपद? चाहत्यांमध्ये उत्सुकता…
शिखर धवनबाबत सांगायचे झाले तर 2015 च्या आयपीएल हंगामात शिखर धवनने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक चेंडूं खेळले होते. त्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादचे संघ आमनेसामने उभे ठाकले होते. त्या सामन्यादरम्यान शिखर धवनने पॉवरप्लेमध्ये एकूण 29 चेंडू खेळून काढले होते. म्हणजेच मिशेल मार्शने खेळलेल्या चेंडूपेक्षा एकने कमीच.
आयपीएल 2025 मुंबईला चांगली कामगिरी करता आली नाही. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एलएसजीने विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला 12 धावांनी पराभूत केले आहे. या विजयासह एलएसजीने या हंगमातील दूसरा विजय आपल्या नावे केला आहे. तर मुंबईला मात्र तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.