Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अण्णा हजारे यांच्या संस्थांकडून माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली; लोकजागृती सामाजिक संस्थेचा आरोप

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याशी संबंधित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनासह इतर संस्थांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली होती. यामध्ये माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप तालुक्यातील निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास घावटे यांनी केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 06, 2022 | 03:03 PM
अण्णा हजारे यांच्या संस्थांकडून माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली; लोकजागृती सामाजिक संस्थेचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

पारनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याशी संबंधित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनासह इतर संस्थांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली होती. यामध्ये माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप तालुक्यातील निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास घावटे यांनी केला. देशातील जनतेला माहितीचा अधिकार मिळावा यासाठी मोठा संघर्ष केलेल्या हजारे यांच्याशी संबंधित संस्थांकडून पळवाट काढून माहिती दडवून ठेवली जात असल्याने धक्का बसल्याचे घावटे यांनी सांगितले.

पत्रकात म्हटले आहे की, हजारे यांच्याशी संबंधित असलेल्या राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास, स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी, हिंद स्वराज ट्रस्ट व आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्था यांच्याकडून लोकजागृती संस्थेच्या वतीने या संस्थांचे गेल्या दहा वर्षांतील लेखापरीक्षण अहवाल व इतर माहिती मागवण्यात आली होती. मात्र, सरकारी अनुदान प्राप्त होत नसल्याने या संस्था माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नसल्याचे कळवताना माहिती देण्यास नकार दिल्याचे घावटे यांनी म्हटले आहे. राळेगणसिद्धी ग्रामपंचायत व श्रीसंत यादवबाबा शिक्षण प्रसारक संस्थेकडूनही माहिती मागवण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप उत्तर मिळाले नाही असे घावटे यांनी म्हटले आहे.

संशय बळावला…

पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील टॅंकर घोटाळ्यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील काही संशयित राळेगणसिद्धी येथील उपरोक्त संस्थांचे पदाधिकारी आहेत. या संशयित आरोपींनी टॅंकर घोटाळ्यातील काही रक्कम उपरोक्त संस्थांकडे वळवली असल्याचा संशय लोकजागृती सामाजिक संस्थेला आहे. त्यामुळे संबंधित संस्थांकडून माहिती मागवण्यात आली होती. हजारे यांच्या संस्थांमधील कारभार पारदर्शक असेल, असा सार्वत्रिक समज आहे .मात्र, या समाजाला धक्का बसला आहे. माहिती नाकारल्याने टॅंकर घोटाळ्यातील रक्कम संबंधित संस्थांकडे वळवल्याचा आमचा संशय बळावला आहे.

Web Title: Violation of rti act by anna hazare organizations allegation of lokjagruti social organization nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2022 | 02:43 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Anna Hazare

संबंधित बातम्या

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?
1

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.