Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्थायी’च्या सभापतीपदी विरेंद्रसिंघ गाडीवाले यांची निवड; एकही अर्ज न आल्याने बिनविरोध निवड

नांदेड वाघाळा महापालिकेमध्ये विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी स्थायी समितीचे सभापती पद भूषविले असून त्यांना पुन्हा सभापती पदाची संधी देण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 24, 2026 | 03:20 PM
Virendra Singh Gadivale Chairman Standing Committee Nanded-Waghala Municipal Corporation

Virendra Singh Gadivale Chairman Standing Committee Nanded-Waghala Municipal Corporation

Follow Us
Close
Follow Us:

Nanded Waghala News : नांदेड : मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सोमवार २३ रोजी उमेदवारी दाखल केला असून एकमेव अर्ज आल्यामुळे सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड होणार आहे, आज (दि.24) सकाळी ११ वाजता होणाऱ्या विशेष सभेत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे. स्थायी समितीच्या सभापती पदासाठी विरेंद्रसिंघ गाडीवाले, सदाशिव पुरी, अभिषेक सौदे, सुमित मुथा, दिपाली मोरे आदींची नावे चर्चेत होती. (Nanded News)

मात्र विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सोमवारी दुपारी आपला उमेदवार अर्ज नगरसचिव तथा उपायुक्त स. अजितपालसिंघ संधू यांच्याकडे सादर केला. यावेळी महापौर कविता मुळे उपमहापौर दिपकसिंह रावत, किशोर स्वामी, दिलीप कंदकुर्ते, सभागृह नेते अॅड. महेश कनकदंडे, अभिषेक सौदे, सदाशिव पुरी, उमेश पवळे, तुलजाराम यादव, संदीपसिंघ गाडीवाले, सदिच्छा सोनी, सुमित मुथा आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : महिला आयोग अध्यक्षानंतर आता प्रदेशाध्यक्ष पद देखील जाणार? रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार

तिजोरीची चावी उत्तरकडेच

यापूर्वीही विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी स्थायी समितीचे सभापती पद भूषविले असून त्यांना पुन्हा सभापती पदाची संधी देण्यात आली. मनपाच्या तिजोरीची चावी उत्तर नांदेड भागाकडेच ठेवण्याचे काम खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले आहे. नव्या चेहऱ्याला संधी देण्याऐवजी ‘जुने ते सोने व म्हणत गाडीवाले यांना संधी देण्यात आली. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असून कर्जाचा भार डोक्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील वाचा : पक्षांतर्गत कलहामुळे काँग्रेसचे समीकरण बिघडलं; आता प्रतिष्ठेची बनली लढाई

उखडलेल्या नगरसेवकांचे रस्त्याकडे अजूनही दुर्लक्ष

शहरातील नागरिकांच्या संयमाचा अंत पाहायला मिळत असून नांदेड महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा मानला जाणारा शंकरराव चव्हाण पुतळा ते भाग्यनगर चौक दरम्यानचा प्रमुख रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून उखडलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर मोठमोठे खड्डे, धूळ आणि दगडधोंडे यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून अपघातांचाही धोका वाढला आहे. विशेषतः रुग्णवाहिका, शालेय बस आणि दैनंदिन प्रवासी यांना याचा मोठा फटका बसत आहे. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत.

Web Title: Virendra singh gadivale chairman standing committee nanded waghala municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Nanded
  • nanded news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : देगलूरमध्ये राजकीय उलथापालथ; अजितदादांच्या अकाली निधनामुळे कार्यकर्ते निराधार
1

Maharashtra Politics : देगलूरमध्ये राजकीय उलथापालथ; अजितदादांच्या अकाली निधनामुळे कार्यकर्ते निराधार

Nanded News : घर विकत घेण्याच्या स्वप्नांना लावलं कुलूप? प्रॉपर्टीचे खरेदीदार कमी, दलाल जास्त
2

Nanded News : घर विकत घेण्याच्या स्वप्नांना लावलं कुलूप? प्रॉपर्टीचे खरेदीदार कमी, दलाल जास्त

Maharashtra Politics : राष्ट्रवादीने दिला शिवसेनेला चेकमेट; नांदेडमध्ये राजकारण तापण्याची चिन्हे लागली दिसू
3

Maharashtra Politics : राष्ट्रवादीने दिला शिवसेनेला चेकमेट; नांदेडमध्ये राजकारण तापण्याची चिन्हे लागली दिसू

नांदेड भाजपला आता निष्ठावंतांची गरज नाही? स्वीकृत नगरसेविकांबाबत आश्वासन वेगळे अन् निर्णय वेगळा
4

नांदेड भाजपला आता निष्ठावंतांची गरज नाही? स्वीकृत नगरसेविकांबाबत आश्वासन वेगळे अन् निर्णय वेगळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.