Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; जेजुरी नगरपरिषदेसाठी आज होणार मतदान

तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या अनुषंगाने मतदान प्रक्रिया व मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 02, 2025 | 12:30 AM
अखेर जेजुरीच्या कारभाऱ्यांनी हाती घेतला पालिकेचा पदभार; विकासकार्याचे नवे पर्व सुरु

अखेर जेजुरीच्या कारभाऱ्यांनी हाती घेतला पालिकेचा पदभार; विकासकार्याचे नवे पर्व सुरु

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
  • जेजुरी नगरपरिषदेसाठी आज होणार मतदान
  • मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आज (दि. २) होत आहे. या अनुषंगाने मतदान प्रक्रिया व मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शीतल मुळे, सहाय्यक निवडणूक आधिकारी चेतन मुळे यांनी दिली. जेजुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ही १५ हजार ८०० असून यात महिला मतदारांची संख्या ८२१५ तर पुरुष मतदार संख्या ७५८३ व इतर मतदार २ आहेत. पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

जेजुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी १० प्रभाग असून, यातून २० उमेदवार व एक नगराध्यक्ष निवडून दिला जाणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तीन तर नगरसेवक पदासाठी ५० उमेदवार ही निवडणूक लढवीत आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी १५० आधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त

आधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी ( दि.१) सर्व तिसरे प्रशिक्षण देऊन त्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल नेता येणार नाही. केवळ मतदान केंद्राध्यक्ष व तेथील अधिकाऱ्यांना कामकाजासाठी मोबाईल वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

उद्या होणार मतमोजणी

बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी मतमोजणी सकाळी १० वाजता जेजुरी येथील मल्हार नाट्यगृह येथे सुरू होणार असून, मतपेट्या ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येक उमेदवारांचे एक प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. निवडणूक यंत्रणेसाठी प्रशासन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शीतल मुळे तसेच निवडणूक विभागाचे बाळासाहेब खोमणे यांनी सांगितले.

Web Title: Voting for jejuri nagarparishad elections will be held today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Election News
  • jejuri
  • Jejuri Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.