Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bavdhan Road: पहिल्याच पावसात २२ लाखांचा निधी गेला खड्यात! वाई–बावधन रस्त्याच्या निकृष्ट कामावर संताप

Bavdhan Road: वाई–बावधन–कणूर–दरेवाडी मार्गाची २२ लाख रुपयांत दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पहिल्याच पावसात रस्ता पुन्हा खड्डेमय झाल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 03, 2026 | 07:04 PM
पहिल्याच पावसात २२ लाखांचा निधी गेला खड्यात! वाई–बावधन रस्त्याच्या निकृष्ट कामावर संताप

पहिल्याच पावसात २२ लाखांचा निधी गेला खड्यात! वाई–बावधन रस्त्याच्या निकृष्ट कामावर संताप

Follow Us
Follow Us:
  • वाई – बावधन रस्त्यावर खड्याचे साम्राज्य
  • पहिल्याच पावसात ठेकेदाराने २२ लाखांचा निधी घातला खड्यात
  • ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर नागरिकांचा सवाल
बावधन : वाई शहरातील सर्वाधिक रहदारी असणारा वाई–बावधन–कणूर–दरे वाडी हा महत्त्वाचा रस्त्याची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पूर्णपणे दुरावस्था झाली होती. या रस्त्याने बावधन, दरेवाडी,कणूर, अनपटवाडी,वाघजाई वाडी, पांढरेची वाडी, म्हातेकर वाडी,नागेवाडी इत्यादी गावातील नागरिकांची,शाळकरी मुलांची,महिलांची मोठ्या प्रमाणात रहदारी चालू असते. परंतु गेले वर्षभरापासून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली होती.त्यामुळे अनेक अपघात घडले होते.या रस्त्यावरून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता.या संदर्भात मागील वर्षी ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीची मागणी मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे.त्यावेळी मंत्री मकरंद पाटील यांनी २२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून काम करण्यास ठेकेदाराला सांगितले. त्यानुसार काम देखील चालू झाले.परंतु पहिल्याच पावसात हा रस्ता पुन्हा जैसे थे अवस्थेत झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

Pune Rain: बाहेर जाताय, मग सावधान! Khadakwasla धरणातून मुठा नदीत…; पुणेकरांनो सावधान

वाई – बावधन हा रस्ता फक्त एका गावाला जोडणारा नसून लगतच्या आठ ते नऊ लाजणं मोठ्या गावानं तसेच वाड्या वस्त्यांना तालुक्यापर्यंत जोडणारा रस्ता आहे.यावरून रोज हजारो नागरिक,शाळकरी मुले,वयोवृद्ध गृहस्थ प्रवास करत असतात.एवढा निधी वापरून सुधा रस्त्यावर पुन्हा मोठ मोठाले खड्डे जसेच्या तसे तयार झालेलं आहेत.त्यामध्ये पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साठले जाते.अनेक वेळा प्रवास करत असताना साचलेल्या पाण्याने खाद्याची खोली जाणवत नसल्याने अपघात होत आहेत.तसेच शाळकरी मुलांचे गणवेश चिखलाने खराब होत आहे.अनेक लहान लहान मुले सायकलवर तालुक्याच्या ठिकाणी शाळेत जात असतात त्यावेळी असणाऱ्या खड्ड्यांमुळे मुलांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

बावधन परिसरातील अनेक लोक हे कामासाठी वाई येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये जात असतात.त्यावेळी रात्री उशिरा घरी परतत असताना त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन मागील वर्षी रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून बावीस लाख रुपयांचा निधी मजूर करण्यात आला होता.परंतु ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे काम केल्याने पुन्हा एकदा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.आपला कामातील निकृष्टपणा झाकण्यासाठी सध्या ठेकेदाराने खाद्यामध्ये खडी भरून वरून सिमेंट टाकून नागरिकांची दिशा भूल केली आहे.त्यामुळे नागरिकांच्यांधे संतापाची भूमिका निर्माण झाली आहे.याबाबत मंत्री मकरंद पाटील काय काय निर्णय घेणार.तसेच संबंधित ठेकेदारावर काय कार्यवाही करणार असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

मंत्रीमहोदय शांत का?

वाई – बावधन रस्त्यासाठी लागणारा योग्य तो निधी मंजूर केला,परंतु त्या निधीचा ठेकेदारी योग्य वापर केला का नाही? केला असेल पहिल्याच पावसात रस्त्याची पुन्हा जैसे थे अवस्था कशी झाली ? ठेकेदार मंत्र्यांच्या मर्जीतील असल्याने त्याच्यावर कोणतीही कार्यवाही नाही का? मंत्र्यांचे गावाकडे दुर्लक्ष झाले आहे का ? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

प्रशासन बेजबाबदार?

नागरिकांच्या सोई सुविधा पूर्ण करण्यासाठी शासनाकडून येणाऱ्या निधीची योग्य पुरतात होते का? याबाबद प्रशासन दखल घेत असत का? का प्रशासनातील अधिकाऱ्यांना टक्केवारी मिळत नसल्याने ते जबाबदारी डावतायत का? अधिकाऱ्यांचा ठेकेदारांवर अंकुश राहिला नाही का? प्रशासन अकार्यक्षम झालं आहे का? अशी शंका नागरिक उपस्थित करीत आहेत.

‘अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावी,’ विसरलेल्या भाषणावरून सुजात आंबेडकरांचा अमित ठाकरेंवर निशाणा !

Web Title: Wai bavdhan kanur road damaged again after first rain despite rs22 lakh repair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Satara

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.