
Walmik Karad bail hearing in court prior before Dhananjay Deshmukh made serious allegations
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील सुनावणीसाठी जाणार आहे. मात्र त्यापूर्वी धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधून वाल्मिक कराड आणि त्याच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला आहे. यावेळी धनंजय देशमुख यांनी आम्हाला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे, असे मत मांडले.
हे देखील वाचा : ही लोकशाहीची गळचेपी…! आयोगाच्या निवडणूक जाहीर करण्याच्या टायमिंगवर विरोधकांना संशय
काय म्हणाले धनंजय देशमुख?
धनंजय देशमुख म्हणाले की, “आम्हाला फक्त न्यायाची अपेक्षा आहे आणि आम्ही न्यायव्यतिरिक्त काही बोललेलो नाही. परंतु दुर्दैव असं आहे की आरोपी नंबर एकने हायकोर्टात 12 तारखेला बेल एप्लीकेशन दाखल केले होते. त्यासंदर्भात आर्ग्युमेंटचा काही भाग आज कोर्टात होणार आहे. आरोपीचे राज आश्रय घेतलेले समर्थक हे न्यायालय, एसआयटी, मुख्यमंत्री, सीआयडी यांना चॅलेंज करत आहेत. कोर्टामध्ये काय प्रक्रिया सुरू आहे त्याबद्दल मी बोलणार नाही ते वकील बोलत आहेत परंतु आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि असे कोणीही समजू नये देशमुख कुटुंब एकटा आहे देशमुख कुटुंबाला कुठेतरी भयभीत केला जाईल आणि असा कोणाचा गैरसमज असेल तर तो काढून टाकावा,” असे धनंजय देशमुख म्हणाले.
हे देखील वाचा : निवडणूक जाहीर झाली पण ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
त्याचबरोबर धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडच्या समर्थकांवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, “आरोपीचे समर्थक असे का करत आहेत, किंवा जे वावड्या उठवत आहेत, त्यावर मी आर्गुमेंट झाल्यावर बोलणार आहे. त्यांनी जी अराजकता माजवलेली होती ती खूप भयानक होती, त्यांना ना कुठल्या गोष्टीचे भय ना चिंता आहे, त्यांना वाटते आपण जे करतो तोच कायदा आहे आणि आपण कायद्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे ते चुकीच्या वल्गना आणि व्हाट्सअप स्टेटस टाकत असतात, चुकीच्या पद्धतीचे इंस्टाग्राम वर रिलस टाकत असतात, आरोपीची हत्तीवर मिरवणूक काढायची अशा पोस्ट करत असल्याचा मोठा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात बीडचे पोलीस काय करत आहेत,” असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.