Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोयाबीनच्या वाणाचे 5 नमुने बनावट, ऐन हंगामात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन निघाले नसल्याच्या तक्रारी झाल्यानंतर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती.. त्यामध्ये गणेशा सोयाबीन वाणाचे ५ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 23, 2025 | 12:55 AM
सोयाबीनच्या वाणाचे 5 नमुने बनावट, ऐन हंगामात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

सोयाबीनच्या वाणाचे 5 नमुने बनावट, ऐन हंगामात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

खरीप हंगाम आला की वाढती मागणी लक्षात घेता काही कंपन्या व विक्रेत्यांकडून बोगस खत-बियाण्यांची विक्री केली जाते. परंतु, त्याचा आर्थिक फटका शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना बसतो. यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन निघाले नसल्याच्या तक्रारी झाल्यानंतर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती.. त्यामध्ये गणेशा सोयाबीन वाणाचे 6 नमुने घेण्यात आले होते. ते नमुने नागपूरयेथील प्रयोगशाळेत पाठवून त्यापैकी 5 नुमने अप्रमाणित आढळून आल्याने वरुण सि प्रा. लि. हैदराबाद कंपनीवर कारवाई केली जात आहे, अशी माहिती कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गुणनियंत्रण विभागाने दिली.

जिल्ह्यात बोगस, खत-बियाण्यांची विक्री होऊ नये, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गुणनियंत्रण
निरीक्षक कार्यरत आहे. याशिवाय जिल्हास्तरीय एक व प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे 8 अशा 9 भरारी पथकांची खरीप हंगामात कंपन्या व विक्रेत्यांवर विशेष नजर असते. खरीप हंगामात भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती. खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना गणेशा सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, उगवण क्षमता असल्यामुळे सोयाबीन निघाले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी केल्या. बोगस बियाण्याबाबत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी कारवाईचे निर्देश दिले होते.

अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गुणनियंत्रण चाफले यांनी हैद्राराबाद येथील वरुण सि अँण्ड इंडिया प्रा. लि. या कंपनीचे गणेशा सोयाबीनचे वाण्याचे 6 नुमने घेऊन नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविले होते. त्यापैकी सोयाबीनचे 3 नमुने अप्रमाणित आढळून आले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बोगस कंपनीचे बियाणे खरेदी केले, त्यांना मोठा फटका बसला.
खरेदी करताना सावधानता बाळगावी शेतकऱ्यांनी खत-बियाणे व किटकनाशके खरेदी करीत असताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी बियाणे व खताची खरेदी केल्यानंतर विक्रेत्याकडून त्याची रितसर पावती घ्यावी. खरेदी पावती सांभाळून ठेवल्यास बियाणे बोगस निघाले तर संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करून नुकसानभरपाई मिळवता येते.

राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिले होते निर्देश

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी गणेश सोयाबीनचे वाण पेरणी केले होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन बियाणे न निघाल्याने शेतकऱ्यांना आमदार राजेश बकाने यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत आढावा बैठकीत राजेश बकाने यांनी प्रश्न उपस्थित राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे लक्ष वेधले. यावेळी डॉ. भोयर यांनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

नागपूरच्या प्रयोगशाळेत होते तपासणी

वरुण सिड्स अँड इंडिया प्रा. लि. हैदराबाद या कंपनीचे गणेश सोयाबीनचे वाणचे 6 नुमने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी 5 नमुने बोगस निघल्याचा तपासात आढळून आले. प्रयोगशाळेत नमुना नापास झाला, तर संबंधित कंपनीविरुद्ध नोटीस पाठवून न्यायालयीन खटला दाखल करण्यात येईल.

Web Title: 5 samples of soybean varieties are fake causing huge losses to farmers during the season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 12:55 AM

Topics:  

  • Agricultural News
  • soyabin

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे
1

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

सांगली जिल्ह्यात 35 टक्के खरीप पेरण्या पूर्ण; सोयाबीनमध्ये घट होणार?
2

सांगली जिल्ह्यात 35 टक्के खरीप पेरण्या पूर्ण; सोयाबीनमध्ये घट होणार?

Pune Agricultural News: मॉन्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका; पुण्यात केवळ २०% खरीप पेरण्या पूर्ण
3

Pune Agricultural News: मॉन्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका; पुण्यात केवळ २०% खरीप पेरण्या पूर्ण

शाकाहारी प्रेमींसाठी खास! यंदाच्या विकेंडला घरी बनवून पहा रेस्टाॅरंट स्टाइल Soya Chili; नोट करा रेसिपी
4

शाकाहारी प्रेमींसाठी खास! यंदाच्या विकेंडला घरी बनवून पहा रेस्टाॅरंट स्टाइल Soya Chili; नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.