Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : सेलूमध्ये रस्ता रुंदीकरणाचा बोजवारा; उघड्या नालीत पडल्या 2 म्हशी, कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे अपघात

सेलू शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या संथ कामामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. उघड्या नालीत दोन म्हशी अडकल्याच्या घटनेनंतर प्रशासन आणि कंत्राटदाराविरोधात संताप व्यक्त केला जात असून काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 02, 2026 | 09:21 PM
सेलूमध्ये रस्ता रुंदीकरणाचा बोजवारा; उघड्या नालीत पडल्या 2 म्हशी

सेलूमध्ये रस्ता रुंदीकरणाचा बोजवारा; उघड्या नालीत पडल्या 2 म्हशी

Follow Us
Follow Us:

सेलू, (ता. प्र.). शहरातील रस्ता रुंदीकरणाचे काम तब्बल २ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. रखडलेल्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वाहनचालक, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या सिमेंटच्या नाल्यांच्या कडेला भराव न टाकल्याने शनिवारी दुपारी २ म्हशी उघड्या नालीत अडकून जखमी झाल्याची घटना घडली. नागरिकांनी मोठ्या शर्थीने या म्हशींना बाहेर काढले.

रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान शहरातील मुख्य मार्गालगत सिमेंटच्या नाल्यांची उभारणी करण्यात आली. मात्र नाल्यांच्या दोन्ही बाजूंना आवश्यक भराव टाकण्यात आलेला नाही. गत २ महिन्यांपासून नाल्यांच्या खोल कड़ा उघड्याच असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. अखेर या निष्काळजीपणाचा फटका २ म्हशींना बसला. दोन्ही म्हशी नालीत अडकून जखमी झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नांनी दोन्ही जनावरांना बाहेर काढले. मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेने संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

रस्ता रुंदीकरणाचे काम रखडल्यामुळे संपूर्ण मार्ग चिखलमय झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे, मातीचे ढिगारे आणि अपूर्ण नाल्यांची कामे यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार वारंवार घसरून अपघातग्रस्त होत असून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापाऱ्यांनाही रोजच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट बनत असून चिखल, साचलेले पाणी आणि उघड्या नाल्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Wardha News : 153 जि.प. शाळांच्या इमारती धोकादायक; गळती छते, तडे गेलेल्या भिंतींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

नागरिकांच्या मते, इतका गंभीर प्रश्न निर्माण होऊनही संबंधित कंत्राटदारावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. प्रशासनाकडूनही कामाला गती देण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.

याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे शहरातील विविध सामाजिक संघटना रस्ता आणि राजकीय पक्षांनी या प्रश्नावर मौन बाळगल्याची चर्चा सुरू आहे. तसेच नागरिकांनी प्रशासनाकडे रुंदीकरणाचे काम तातडीने युद्धपातळीवर पूर्ण करण्याची, उघड्या नाल्यांवर त्वरित भराव टाकण्याची आणि निष्काळजी करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अशा आहेत मागण्या

रुंदीकरणाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, उघड्या नाल्यांच्या कडेला त्वरित भराव टाकून सुरक्षितता सुनिश्चित करावी, निष्काळजी कंत्राटदारावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, पावसाळ्यात तात्पुरती सुरक्षित वाहतूक व्यवस्था करावी, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी जबाबदारी निश्चित करावी.

Wardha News : शाळा सुरू होऊन एक महिना उलटला, अद्याप दुसऱ्या गणवेशासाठी निधी नाही; शिक्षण विभागाने वरिष्ठांकडे केली मागणी

अपघाताचा धोका वाढला

रस्ता रुंदीकरणाच्या संथ कामामुळे शहरातील मुख्य मार्गावर खड्डे चिखल आणि उघड्या नाल्यांचा विळखा निर्माण झाला आहे दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त होण्याच्या घटना वाढत असून पादचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शनिवारी २ म्हशी नालीत अडकल्याच्या घटनेने परिस्थिती किती गंभीर बनली आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Web Title: Selu road widening open drain buffaloes injured citizens angry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण
1

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.