Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Wardha News : वर्धा जिल्ह्यात यंदा प्रधानमंत्री पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ९४ हजार ४२३ शेतकऱ्यांनी १ लाख ७५ हजार २१५ अर्ज दाखल केले असून, १ लाख ८५ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे कवच मिळाले आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 18, 2026 | 03:13 PM
९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Follow Us
Follow Us:
  • ९४ हजार ४२३ शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत सहभाग
  • १ लाख ८५ हजार ३०१ हेक्टर पिकांना विमा संरक्षण
  • शेतकऱ्यांकडून १ कोटी १३ लाख ३२ हजार १० रुपयांचा विमा हप्ता
 

Wardha News : खरीप हंगामातील पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यात ९४ हजार ४२३ शेतकऱ्यांनी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा १ लाख ७५ हजार २१५ अर्जाची नोंदणी झाली आहे. या माध्यमातून तब्बल १ लाख ८५ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण मिळाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित १ कोटी १३ लाख ३२ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे.

नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पावसातील खंड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी पीकविमा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला आहे. खरीप पिकांचे हंगामात असमानी व सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते. यापासून बचाव होण्याकरीता व आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी सरकारने पीकविमा योजना लागू केली आहे.

पीकविमा योजनेतील शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय

वर्ष २०२४ मध्ये केवळ एक रुपया भरून पिकांचा विमा काढण्यात येत होता. त्यावर्षी २ लाखांवर शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला होता. २०२५ मध्ये ही योजना बंद करण्यात ३५ हजार आली. पीकविम्यासाठी ८४५ शेतकऱ्यांना काही रक्कम भरावी लागली. यामुळे शेतकऱ्यांनी पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद दिला नाही. २०२५ मध्ये केवळ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी ५८ हजार ६९३ अर्ज केले होते. यावर्षी प्रीमियम रकमेत कपात केल्याने ९४ हजार ४२३ शेतकऱ्यांनी १ लाख ७५ हजार २१५ अर्ज केले आहेत. यातून १ लाख ८५ हजार ३०१ हेक्टर शेतीला विम्याचे संरक्षण मिळाले आहे. शेतकऱ्यांनी १ कोटी १३ लाख ३२ हजार १० रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे भरली आहे. त्यामुळे यंदा पीकविमा योजनेतील शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे.

Wardha News : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर, जिल्ह्यातील ४३ हजार ७९९ शेतकऱ्यांचा याद्या पोर्टलवर

जिल्हा अधीक्षक उपरकर यांची महत्वाची प्रतिक्रिया

यावर जिल्हा अधीक्षक, अरविंद उपरीकर म्हणाले, “खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून ने काढणीपर्यंत कालावधीत नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरित परिणाम करणाऱ्या हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोगाच्या आधारे, महसूल मंडळामध्ये पिकांच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहित धरून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.”

तालुकानिहाय आकडेवारी

हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक ३७ हजार १९८ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. देवळी तालुक्यात २४ हजार ५६६, वर्धा तालुक्यात २० हजार ५२१, सेलू तालुक्यात २० हजार १८०, कारंजा तालुक्यात १५ हजार ८७, आर्वी तालुक्यात १६ हजार २१२, आष्टी तालुक्यात ९ हजार ३३५ आणि समुद्रपूर तालुक्यात ३२ हजार ११६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. विम्याचा लाभ मिळावा. यावर्षी ९४ हजार ४२३ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतल्याने १ लाख ८५ हजार ३०१ हेक्टर मधील पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले आहे.

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

Web Title: Wardha news pik vima yojana maharashtra farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Farmer Loan Waiver
  • Maharashtra Government
  • wardha News

संबंधित बातम्या

जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत ‘लँड टायटलिंग अ‍ॅक्ट’
1

जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत ‘लँड टायटलिंग अ‍ॅक्ट’

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा
2

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी
3

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी

Jaykumar Rawal : ‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन
4

Jaykumar Rawal : ‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.