Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : वर्ध्यात पावसाची दमदार ‘बॅटिंग’, जनजीवन विस्कळीत; आजही दिलाय यलो अलर्ट

वर्धा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. शहरातील ३० घरांत पाणी शिरले असून २७ संवेदनशील गावांवर प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले आहे. आजही यलो अलर्ट कायम आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 31, 2026 | 04:49 PM
Wardha News : वर्ध्यात पावसाची दमदार 'बॅटिंग', जनजीवन विस्कळीत; आजही दिलाय यलो अलर्ट

Wardha News : वर्ध्यात पावसाची दमदार 'बॅटिंग', जनजीवन विस्कळीत; आजही दिलाय यलो अलर्ट

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसामुळे वर्ध्यातील ३० घरांत शिरले पाणी
  • जिल्ह्यातील २७ संवेदनशील गावांवर प्रशासनाची विशेष नजर
  • हवामान विभागाचा आजसाठीही यलो अलर्ट जारी
 

वर्धा, ब्युरो : विश्रांती घेतलेल्या पावसाने वर्धा जिल्ह्यात पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर वेधशाळेने गुरुवारी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. हा अंदाज खरा ठरत गुरुवारी दिवसभर आणि सायंकाळपर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, शुक्रवारसाठी हवामान विभागाने जिल्ह्यास यलो अलर्ट जारी केला आहे.

वर्धा शहरातील ३० घरात पावसाचे पाणी गुरुवारी वर्धा शहरासह परिसरात दिवसभर जोरदार पाऊस झाला. रामनगर, कृष्णनगर, पोद्दार बगीचा, जैन मंदिर परिसर, महादेवपुरा, स्टेशनफैल आदी भागांतील नाल्या तुंबल्याने पावसाचे पाणी साचून सुमारे ३० घरात शिरले. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. पाणी साचलेल्या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नाल्यांतील अडथळे दूर करून पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले.

४.५० कोटींचा वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा उघड; पुरावे जमा …

२७ संवेदनशील गावावर प्रशासनाची विशेष नजर

जिल्ह्यातून १२ प्रमुख नद्या वाहत असून त्यांच्या काठावर सुमारे २१३ गावे वसलेली आहेत. यापैकी २७ गावे अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावांसाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून जिल्हा व तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. संभाव्य पूरस्थिती आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

मुसळधार पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा

जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच वाढीच्या अवस्थेतील सोयाबीन, कापूस, तूर आदी खरीप पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार

देवळी तालुक्यातील ३ गावातील घरात पाणी

देवळी तालुक्यातील शिरपूर, रत्नापूर आणि भिडी या गावांमध्ये नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पाणी काही घरांमध्ये शिरले. या तीन गावांतील सुमारे ५० घरांना पावसाचा फटका बसला असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

Web Title: Wardha heavy rain yellow alert waterlogging flood update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • wardha
  • Wardha district news
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण
1

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.