Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News: कराळे गुरुजींचा पुढील ‘मुव्ह’ काय? २४,२४९ मतांनी दाखवली राजकीय ताकद

Nitesh Karale Nagpur Graduate Constituency Election: नागपूर पदवीधर निवडणुकीत नितेश कराळे गुरुजींनी अपक्ष म्हणून २४,२४९ मते मिळवत राजकीय ताकद दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून निलंबनानंतर ते कोणती राजकीय खेळी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 29, 2026 | 09:51 PM
Nitesh Karale

Nitesh Karale

Follow Us
Follow Us:
  • कराळे गुरुजींची मतांची भरारी
  • राष्ट्रवादीच्या निलंबनानंतर पुढे काय?
  • राजकीय वर्तुळात चर्चा
वर्धा: खदखद मास्तर म्हणून राज्यभर सुपरिचित नितेश कराळे यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जो घाम फोडला, त्याची सध्या जिल्हाभर चर्चा आहे. राष्ट्रवादी (श. प.) पक्षाने त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केल्याने आता ते नेमके काय करणार, याविषयी समाज माध्यमांसह राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. यापुढे मास्तर ‘एकला चलो रे’ मार्ग निवडतील, की राजकीय पक्ष त्यांच्या स्वभावगुणधर्मासह त्यांना स्वीकारत पक्षप्रवेशाचे निमंत्रण देतील आणि तसा प्रस्ताव ते स्वीकारतील का, अशी चर्चा सुरू झाली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय मतांनी त्यांना पुन्हा एकदा सर्वत्र चर्चेत आणले.

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन

महाविकास आघाडीतर्फे विद्यमान आ. अभिजित वंजारी (काँग्रेस) यांना उमेदवारी घोषित झाल्यावर राष्ट्रवादी (श. प.) पक्षाचे इच्छुक कराळे यांनी बंडाचा झेंडा हाती घेत उमेदवारी दाखल केली. सर्व विश्लेषकांनी त्यांना १० हजारांपेक्षा अधिक मते मिळणार नाहीत, अशी भाकित केले. मात्र, कोणतीही संघटन शक्ती सोबत नसताना त्यांनी सर्वांचे भाकित खोटे ठरविले. त्यांनी भरीव मते घेत दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना विजयासाठी ताटकळत ठेवले.

कराळे हे २०२० ला झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढले होते. त्यावेळी ते कोणत्याही राजकीय पक्षात नव्हते. त्या निवडणुकीत त्यांनी ७ हजारांपेक्षा अधिक मते घेतली. यावेळी पुन्हा अपक्ष लढताना त्यांनी मागील मतांमध्ये तब्बल १७ हजारांवर मतांची भर घातली.

या निवडणुकीकरिता मतदान होण्याच्या काही तासांपूर्वी त्यांना राष्ट्रवादी (श. प.) पक्षाने ६ वर्षांसाठी निलंबित केले. त्यानंतर ‘हाय होल्टेज ड्रामा’ झाला. कराळे माध्यमांसमोर पक्षाने ऐनवेळी केलेल्या कारवाईने दुखी होत ओक्साबोक्सी रडले. पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठीही लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका निवडणुकीत विक्रमी सभा घेतल्या.

सरकार, सत्ताधारी पक्ष व नेत्यांवर शाब्दिक हल्ले चढविले आणि हा सर्व महाराष्ट्रभरातील प्रचारसभांचा प्रवास स्वखर्चातून केल्याची मांडणी त्यांनी केली. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी आदर व्यक्त करतानाच त्यांनी पक्षाने केलेल्या कारवाईने दुखावल्या गेलो, असे सांगत ऐन मतदानापूर्वी केलेल्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

टीका अन् प्रसिद्धीही…

कराळे यांचे मूळ गाव मांडवा होय. वडील शेतकरी. कष्टातून उच्च शिक्षण घेत त्यांनी खाजगी शिकवणी वर्गातील अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता मिळविली. कराळे मास्तर अशी ओळख सर्वदूर पसरू लागली. दरम्यानच्या काळात त्यांनी राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर समाजमाध्यमांवर वऱ्हाडी शैलीत रोखठोक मांडणी करण्याचा सपाटा लावला. यातून त्यांची महाराष्ट्रभर ‘खदखद मास्तर’ अशी ओळख निर्माण झाली. त्यांच्या काहीशा शिवराळ शैलीवर टीकाही केली जाते, मात्र त्यांच्या चाहत्यांची संख्या – वाढायला हीच शैली कारणीभूत ठरली, असेही सांगितले जाते.

Wardha News : दुष्काळ निवारणासाठी ‘जलतारा’ देणार बळ, प्रशासन सज्ज; साडे आठ लाख मनुष्यदिनची रोजगार निर्मिती

Web Title: Wardha news nitesh karale nagpur graduate election results next move pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : वर्ध्यात महिला डॉक्टरला आरोपीकडून मारहाण, सीसीटीव्हीत कैद झाली घटना, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !
1

Wardha News : वर्ध्यात महिला डॉक्टरला आरोपीकडून मारहाण, सीसीटीव्हीत कैद झाली घटना, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.