
फोटो सौजन्य सोशल मिडिया
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या संतापजनक घटनेमुळे डॉक्टरांमध्ये प्रचंड संताप उसळला असून डॅाक्टरांनी आता कडक सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच ओपीडी सेवा बंद करण्यात येईल असे देखील सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील वर्धा येथील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिसांच्या उपस्थितीत आरोपी कादिर अलीने वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉ. श्रद्धा यांना कानशिलात लगावली.
SHOCKER 🚨 A man identified as Qadir Ali suddenly slapped Dr. Shraddha Bhumre during medical examination at a PHC in Wardha, Maharashtra. 😳 Outraged doctors demand better security and threaten to suspend OPD services. https://t.co/0mA8i06oR1 — Ankit Trivedi (@MASTERJI108) October 23, 2026
ही घटना पोलीसाच्या उपस्थितीत घडली असून या घटनेचा तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटने नंतर डॅाक्टरांकडून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपी कादिर अली हा जवळच राहणारा आहे. याआधी सुद्धा त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी वर्ध्यातील तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले होते. उपस्थित आरोपीची तपासनी करण्यात आली, नंतर काही कागपत्रावर सही घेण्यात आली. आरोपीने सही करता करता डॅाक्टर श्रद्धा भूमरे यांना चपराक लगावली. ही घटना घडली तेव्हां 5 ते 6 पोलीस उपस्थित होते. असे डॅाक्टरांनी सांगितले.
तसेच या घटनेची जिल्हा अधिकारी कार्यालयास तक्रार करण्यात आली असून डॅाक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. जो पर्यंत कारवाई होत नाही; तो पर्यंत ओपीडी सेवा बंद ठेवण्यात येईल असे डॅाक्टर संघटनेकडुन सांगण्यात आले आहे.