Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : शाळा सुरू होऊन एक महिना उलटला, अद्याप दुसऱ्या गणवेशासाठी निधी नाही; शिक्षण विभागाने वरिष्ठांकडे केली मागणी

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील 41 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दुसऱ्या शालेय गणवेशासाठी अद्याप निधी मिळालेला नाही. शिक्षण विभागाने 1.48 कोटी रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाची मागणी वरिष्ठांकडे केली असून पालकांमध्ये नाराजी वाढली आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 01, 2026 | 03:54 PM
शाळा सुरू होऊन एक महिना उलटला, अद्याप दुसऱ्या गणवेशासाठी निधी नाही;

शाळा सुरू होऊन एक महिना उलटला, अद्याप दुसऱ्या गणवेशासाठी निधी नाही;

Follow Us
Follow Us:

वर्धा, ब्युरो :  जिल्ह्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिना उलटला आहे. मात्र, जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना २ गणवेश देण्याचा दावा करणाऱ्या शासन व प्रशासनाच्या या ढिसाळ कार्यपद्धतीबाबत पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पहिल्या गणवेशाच्या शिल्लक निधीसह दुसऱ्या गणवेशाचा पूर्ण निधी मिळून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला १ कोटी ४८ लाख ८२ हजार ४०० रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. नवीन ऑनलाइन प्रणालीद्वारे शिक्षण विभागाने वरिष्ठ स्तरावर निधीची मागणी पाठविली आहे. जिल्ह्यातील ९५० शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या ४१ हजार ३४० विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभदिला जात आहे.

यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात प्रति गणवेश २४० रुपये या प्रमाणे ९९ लाख २१ हजार ६०० रुपये निधी मंजूर करून तालुकास्तरावर वितरित केला आहे. या निधीतही पालकांना स्वतःच्या खिशातून काही रक्कम खर्च करून एक गणवेश शिवून घ्यावा लागला आहे. हा गणवेश परिधान करूनच विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी दाखल झाल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी दोन गणवेश देण्याची तरतूद आहे. यामध्ये एक नियमित शालेय गणवेश, तर दुसरा स्काऊट-गाइड गणवेश असतो.

कोलमाइन्स प्रकल्पावर हरकतींचा भडीमार, नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार

शासनाकडून प्रति गणवेश ३०० रुपये, म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ६०० रुपये देण्याची तरतूद आहे. मात्र, पहिल्या गणवेशासाठी प्रति विद्यार्थी ६० रुपये शिल्लक रक्कम, तर दुसऱ्या गणवेशासाठी ३०० रुपये अद्याप वितरित करण्यात आलेले नाहीत. शाळा सुरू होऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी शिक्षण विभागाला हा शिल्लक निधी मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश नेमका कधी मिळणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

१.४८ कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा

शिक्षण विभागाला सध्या एकूण १ कोटी ४८ लाख ८२ हजार ४०० रुपयांच्या र अतिरिक्त निधीची प्रतीक्षा आहे. यामध्ये पहिल्या गणवेशाची शिल्लक रक्कम २४ लाख ८० हजार ४०० रुपये, तर दुसऱ्या गणवेशासाठी १ कोटी २४ लाख २ हजार रुपये समाविष्ट आहेत, जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण ४१ हजार ३४० विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत २८ हजार ८२६, राज्य सरकारच्या योजनेंतर्गत ११ हजार ३७५ आणि पीएम श्री योजनेंतर्गत १ हजार १३९ विद्यार्थी आहेत.

दरम्यान, गतवर्षी विद्यार्थ्यांच्या बूट व मौज्यांसाठी प्रति विद्यार्थी १७० रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, यंदा त्यासाठीही अद्याप कोणताही निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे गणवेशासोबतच बूट-मोज्याच्या निधीबाबतही पालकांमध्ये संभ्रम कायम आहे.

६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, ५१ हजार ग्राहकांकडे १२.३२ कोटींची महावितरणची थकबाकी

Web Title: Wardha school uniform second installment fund delay education department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • wardha
  • wardha latest news
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण
1

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.