दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी
कारंजा : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना कारंजा मानोरा मार्गावरील गिर्डा फाट्यानजीक रविवारी (दि. 3) सकाळी 10 च्या सुमारास घडली. पंकज विलास पारसकर (45, रा. कंझरा, ता. मूर्तिजापूर) व चंदू रंगराव तायडे (45, रा. कमळखेडता, मूर्तिजापूर) अशी जखमींची नावे आहेत.
रविवारी पहाटे ते गावातील काकड आरती करून पोहरादेवी येथे दर्शनासाठी जात असताना त्यांची अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीसह ते खाली पडून गंभीर जखमी झाले. अपघाताच्या घटनेनंतर समृद्धी रुग्णवाहिकाचालक अजय घोडेस्वार यांनी त्यांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.
हेदेखील वाचा : सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ई-सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त
दोन खासगी बसची समोरासमोर धडक
दोन खासगी बसची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 3) पहाटे 2 च्या सुमारास मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कारंजा अमरावती मार्गावरील वडगाव फाट्यानजीक घडली. श्रीधर पुंडलिक कायवाडे (45) असे या अपघातात मृत्यू झालेल्या खासगी बस चालकाचे नाव असून, तो अमरावती येथील रहिवासी असल्याची माहिती दिली आहे.
रॉयल ट्रॅव्हल्सची होती बस
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल ट्रॅव्हल्स अमरावतीहून कारंजाकडे येत असताना मार्गातील अपघातस्थळी (एमएच 38/के-7799) क्रमांकाच्या खुराणा ट्रॅव्हल्सला समोरासमोर धडकली. अपघाताबाबत माहिती मिळताच अभिषेक घुले, गौरव भाकरे, वैभव घुले व तेजस घुले यांनी रात्री घटनास्थळावर जाऊन जखमींना अपघात ग्रस्त खासगी बसमधून बाहेर काढले व त्यांना मदत केली.
हेदेखील वाचा : “मी निवडणूक लढवणार नाही…सत्ताबदलातील महत्त्वाचा मास्टरमाईंड, शरद पवारांची राजकारणातून निवृत्ती?