कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक
शिरोली : कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर एक अपघात झाला. यामध्ये भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात मौजे वडगाव फाटा येथे झाला. कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर थांबलेल्या रिक्षाला कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये तिघेजण जखमी झाले. यातील जखमींची नावे समजू शकली नाहीत. या अपघातात दोन कारचे व रिक्षाचे मोठे नुकसान झाले.
कोल्हापूरच्या उचगाव येथील रिक्षा चालक भाडे घेऊन मिरजेकडे गेला होता. चालक व प्रवासी दुपारी जेवणासाठी मौजे वडगाव फाट्यावरील पाटील धाब्यावर थांबले होते. जेवण उरकून ते उचगावकडे जात असताना धाब्याच्याजवळ असणाऱ्या पान टपरीवर सिगारेट घेण्यासाठी रस्त्याच्याकडेला थांबला असता पाठीमागून आलेल्या भरधाव बलेनो कार (क्र. एम एच १० सी एक्स ५७०४) ने रिक्षा (क्र. एम एच ०९ इ एल २१६२) ला जोराची धडक दिली.
हेदेखील वाचा : Pune News: मोठी बातमी! ‘PMP’ चालकांनो सावधान; ‘हे’ कृत्य केल्यास होणार थेट निलंबनाची कारवाई
या धडकेत रिक्षा समोर उभ्या असलेल्या अन्य कारवर जाऊन आदळली. यात रिक्षातील प्रवासी व बलेनो कारमधील दोघे असे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्याना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे . यामध्ये तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, शहापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या घटनेची माहिती मिळतातच घटनास्थळी जीवरक्षक पथक घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केले आहे. ट्रकमधील मयत चालक व क्लिनर यांचा मृतदेह जीवरक्षक पथकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : वाढते रस्ते अपघात ठरतायेत जीवघेणे; यावर नियमित उपाय करणं आहे गरजेचे