Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड-ढेबेवाडी मार्गावर अपघात; कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा मृत्यू

मलकापूर येथील दत्तशिवम कॉलनीत राहणारा इंद्रजीत कणसे हा युवक मंगळवारी दुपारी कराड-ढेबेवाडी मार्गावरून चचेगाव या ठिकाणी गेला होता. तेथून परत येत असताना पंचरत्न पार्क इमारतीसमोर अचानक कुत्रे आडवे आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 01, 2025 | 12:58 PM
देवदर्शन करून परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघात; कार दरीत कोसळली अन्...

देवदर्शन करून परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघात; कार दरीत कोसळली अन्...

Follow Us
Close
Follow Us:

कराड : कराड-ढेबेवाडी मार्गावर आगाशिवनगर-मलकापूर येथील पंचरत्न पार्कसमोर दुचाकी दुभाजकाला धडकून तरुणाचा मृत्यू झाला. रस्त्यात आडवे आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास झाला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाचा मृत्यू झाल्याने एकच चर्चा सुरु आहेत.

इंद्रजीत अधिकराव कणसे (वय 36, रा. दत्तशिवम कॉलनी, आगाशिवनगर, मूळ रा. मालदन-पानवळवाडी, ता. पाटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मलकापूर येथील दत्तशिवम कॉलनीत राहणारा इंद्रजीत कणसे हा युवक मंगळवारी दुपारी कराड-ढेबेवाडी मार्गावरून चचेगाव या ठिकाणी गेला होता. तेथून परत येत असताना पंचरत्न पार्क इमारतीसमोर अचानक कुत्रे आडवे आल्यामुळे इंद्रजितने दुचाकीचा ब्रेक लावला. मात्र, दुचाकी दुभाजकावर आदळल्याने इंद्रजितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

हेदेखील वाचा : KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. कराड शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये भीषण अपघात

मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका बसने दुर्गा मताच्या मंडपाला धडक दिली. या अपघातात 20 हून अधिक लोक जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींचा उपचार रुग्णालयात सुरु आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरच्या सिहोरा भागात ही घटना घडली आहे.

हेदेखील वाचा : नेपाळमध्ये भीषण रस्ता अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली अन्…; २ जणांचा मृत्यू

अभिनेत्री रुपाली भोसले यांच्या कारला अपघात

अभिनेत्री रुपाली भोसले सध्या लपंडाव या मालिकेत काम करताना दिसत आहे, या मालिकेमध्ये अभिनेत्री सरकार ही खलनायिकेची भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच रुपाली भोसले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. रुपालीने नुकत्याच खरेदी केलेल्या लक्झरी कारचा अपघात झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे रुपालीने काही दिवसांआधीच ही कार खरेदी केली होती ज्याची माहिती तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली.

Web Title: Accident on karad dhebewadi road a youth died in accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • Karad news
  • Road Accident

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.