Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : वाशिमचे सीएस पुन्हा राज्यात ‘सर्वोत्कृष्ट’! मूर्तिमंत नेतृत्वाचे ज्वलंत उदाहरण

नेतृत्वात बदल झाल्यास शासकीय आरोग्य सेवेतही आमूलाग्र परिवर्तन शक्य आहे, याचे उदाहरण वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिले असून ऑक्टोबर महिन्यात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 17, 2025 | 07:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • पूर्वी आरोग्य सेवा निर्देशकांच्या अंमलबजावणीत वाशिम जिल्हा राज्यातील ‘टॉप फाइव्ह’मध्येही नव्हता
  • वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शनही महत्त्वाचे
  • पारदर्शक कार्यपद्धतीमुळे वाशिम जिल्ह्याचे नाव आज महाराष्ट्राच्या आरोग्य नकाशावर अभिमानाने झळकत आहे
कर्तृत्ववान आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले, तर शासकीय यंत्रणेतही उल्लेखनीय बदल घडू शकतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय. राज्याच्या आरोग्यसेवा आयुक्तालयाने राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत जाहीर केलेल्या ऑक्टोबर महिन्याच्या रँकिंगमध्ये वाशिम जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी पुन्हा एकदा ‘सर्वोत्कृष्ट’ ठरण्याचा बहुमान मिळवला आहे. हा सन्मान केवळ आकडेवारीवर आधारित नसून, गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याबाबत असलेली तळमळ, नियमांचे काटेकोर पालन आणि सहकाऱ्यांना कुटुंबाप्रमाणे सोबत घेऊन काम करण्याची संवेदनशील कार्यपद्धती हेच या यशामागील खरे कारण ठरले आहे.

राज्यात शिक्षकांसाठी ‘प्रश्न-मंजुषा’! YB सेंटरच्या या उपक्रमात ६००५ शिक्षकांची हजेरी

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत मातृआरोग्य, बालआरोग्य, कुटुंबनियोजन यांसह तब्बल ३० महत्त्वाच्या आरोग्य निर्देशकांवर आधारित तपासणी आरोग्य विभागाच्या पथकाने ऑक्टोबर महिन्यात केली होती. या कसून पाहणीदरम्यान वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयात पुरविण्यात येणाऱ्या सेवांना ‘सर्वोत्कृष्ट’ असा शेरा देण्यात आला. सुरक्षित प्रसूतीसाठी वात्सल्यपूर्ण सेवा, अद्ययावत डायलिसीस सुविधा, कुपोषित बालकांसाठी पुनर्वसन केंद्र (एनआरसी) यासह गंभीर रुग्णांसाठी सुसज्ज आयसीयू, अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तपेढी, सोनोग्राफी व सीटी स्कॅन यांसारख्या जीवनदायिनी सुविधा येथे उपलब्ध असल्याचे पथकाने नमूद केले.

पूर्वी आरोग्य सेवा निर्देशकांच्या अंमलबजावणीत वाशिम जिल्हा राज्यातील ‘टॉप फाइव्ह’मध्येही नव्हता. मात्र, सुमारे अडीच वर्षांपूर्वी डॉ. अनिल कावरखे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदलांची नवी पहाट उगवली. कर्मचाऱ्यांशी आपुलकीची वागणूक, संघभावनेतून काम करण्यावर दिलेला भर आणि रुग्णांशी सौजन्यपूर्ण संवाद यामुळे केवळ भौतिक व मूलभूत सुविधा सुधारल्या नाहीत, तर शासकीय आरोग्य सेवांवरील नागरिकांचा विश्वासही पुन्हा दृढ झाला.

शासनाचे काम करताना शासनानेच कापला शिक्षकांचा पगार! अखेर पुरोगामी शिक्षक संघटनेच्या लढ्याला यश

या यशामागे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले आहे. मात्र, या यशाचे खरे श्रेय वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी बांधव यांच्या एकत्रित, प्रामाणिक आणि समर्पित प्रयत्नांना जाते, असे डॉ. कावरखे यांनी नमूद केले. भविष्यातही अधिक प्रभावी, दर्जेदार आणि संवेदनशील आरोग्य सेवा पुरविणे हेच आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. माणुसकीचा स्पर्श, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे वाशिम जिल्ह्याचे नाव आज महाराष्ट्राच्या आरोग्य नकाशावर अभिमानाने झळकत आहे.

Web Title: Washims cs again best in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 07:27 PM

Topics:  

  • daily health
  • Washim news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.