फोटो सौजन्य - Social Media
या स्पर्ध्येत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० संदर्भाने ‘मूल्यांकनाच्या नव्या दिशा’ हा मध्यवर्ती विषय ठेवण्यात आला. या विषयावर आधारित शिक्षकांना प्रश्न विचारण्यात आले. ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्ध्येत एकूण ६००५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. मराठी तसेच इंग्रजी अशा दोन्ही भाषेत या स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले होते, जेणेकरून दोन्ही माध्यमांचे शिक्षक या स्पर्ध्येत उत्स्फूर्त प्रतिसाद देतील आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतील. एकंदरीत, या स्पर्ध्येचे आयोजन YB सेंटर आणि शिक्षण विकास मंचद्वारे करण्यात आले आहे. या स्पर्ध्येचे मुख्य संयोजन डॉ. वसंत काळपांडे यांनी केले आहे. तसेच विषयतज्ज्ञ म्हणून कामगिरी डॉ. नेहा बेलसरे व डॉ. आराधना कुलकर्णी यांनी बजावली आहे. तांत्रिक मदत अजित तिजोरे तर मुख्य समन्वयक म्हणून डॉ. माधव सूर्यवंशी यांनी कामगिरी बजावली आहे.
कोण आहेत विजेते?
या स्पर्ध्येत पहिला क्रमांक सोनाली सदरे (कोल्हापूर) यांनी मिळवला आहे तर दुसरा क्रमांक शांत भालचंद्र चिपकर (सिंधुदुर्ग) यांनी मिळवला आहे. तर तिसऱ्या स्थानी नितीन भिकनराव बारगळ (अहिल्यानगर) विजयी ठरले आहेत. या स्पर्ध्येत एकूण २४६ स्पर्धकांनी २५ गुण मिळवले आहेत. एकूण २१७५ स्पर्धकांनी २० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. पहिल्या तीन विजेत्यांचा ४ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरव होणार आहे.






