Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Shortage in Pune: पुणे जिल्ह्याच्या पाणी टंचाईवर प्रशासनाचा ‘मास्टर प्लॅन’; ३५ कोटी ७४ लाखांचा आराखड्याला मंजूरी

Water Shortage in Pune: पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी विविध उपाययोजना सुचविल्या होत्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 13, 2026 | 10:03 AM
Pune Water Supply, Water Scarcity, Pune Zilla Parishad, Pune News, Maharashtra Water Crisis,

Pune Water Supply, Water Scarcity, Pune Zilla Parishad, Pune News, Maharashtra Water Crisis,

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी३५ कोटी ७४ लाख ९३ हजार रुपयांच्या पूरक कृती आराखड्याला मंजुरी
  • १ एप्रिल ते ३० जून २०२६ या त्रैमासिक कालावधीसाठी नवीन आराखडा
  • वाढत्या शहरीकरणामुळे उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने विविध उपाययोजनांसाठी या निधीत पुरेशी तरतूद
Water Shortage in Pune : गेल्या काही वर्षांत पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये उन्हाळ्यात पाणीकपात केली जाते, वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा निर्णय घेतला जात आहे. या वर्षीदेखील जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती आहे. पण जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा परिषदेने ३५ कोटी ७४ लाख ९३ हजार रुपयांचा पूरक पाणी टंचाई कृती आराखडा तयार केल्याची माहिती समोर आली आहे. या आराखड्याला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मंजुरी दिली आहे. या कृती आराखड्यात पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली.

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स

जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी यापूर्वी १ ऑक्टोंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ आणि १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठीचा ३५ कोटी ६४ लाख ४० हजार रुपयांचा पाण टंचाई निवारणासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर आता १ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीसाठीचा संभाव्य पाणी टंचाईसाठीचा त्रैमासिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी विविध उपाययोजना सुचविल्या होत्या. या प्राप्त सुचनांनुसार ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन हा पुरवणी टंचाई आराखडा सादर करण्याबाबतची मागणी या सदस्यांनी केली होती. त्यानुसार हा पुरक टंचाई आराखडा जिल्हाधिकारी डुडी यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता, असे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी

टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांनिहाय निधीची तरतूद (रुपयांत)

– नविन विंधनविहीरी घेणे — १० कोटी १५ लाख २५ हजार.

– नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती — १२ कोटी २१ लाख ५१ हजार

– विंधनविहीरींची विशेष दुरुस्ती — १ कोटी ४० लाख १७ हजार

– टँकरने पाणी पुरवठा करणे — १ कोटी ४४ लाख ५० हजार

– खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे — २ कोटी ९२ लाख ७० हजार

– विहीरी खोल करणे किंवा गाळ काढणे — २६ लाख ८५ हजार

– पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे — ७ कोटी २४ लाख

– प्रगतीपथावरील नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करणे — ९ कोटी ९५ लाख

– एकूण — ३५ कोटी ७४ लाख ९३ हजार

जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. या निधीच्या माध्यमातून टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना प्रसंगी टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली आहे.

 

 

 

Web Title: Water shortage in pune plan worth 3574 crore approved for alleviating water scarcity in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • Pune water supply

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.