कळमोडी आणि नाझरे ही धरणे १०० टक्के भरली असून, चासकमान, वडज, विसापूर, पवना, गुंजवणी, वीर, कासारसाई, वडिवळे, आंद्रा, चिल्हेवाडी, घोड आणि येडगाव या धरणांमध्येही ७२ टक्क्यांहून अधिक पाणी साठले आहे.
नळातून येणारे पाणी चिखलासारखे, पिवळसर आणि अशुद्ध असल्याने नागरिकांना अंघोळ, धुणी आणि स्वयंपाकात वापर करणेही धोकादायक वाटत आहे. या पाण्यामुळे डेंग्यू, कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रो यांसारखे आजार होण्याचा धोका वाढला आहे.
वडगावशेरीसह खराडी भागात अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी दाबाने तसेच काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
पाण्याची गळती शोधण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला जलवाहिन्यांत 1.5 बार या प्रमाणात प्रेशरने पाणी सोडावे लागेल, हे पाणी पुण्याच्या दैनंदिन गरजेच्या तिप्पट पाणी महापालिकेला उचलावे लागेल.
मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा येत्या बुधवारी (सहा मार्च) बंद ठेवला जाणार आहे. तर या भागात गुरुवारी (सात मार्च) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी…
पर्वती येथील एमएलआर टाकी वरून ते जगताप हाऊस दरम्यान नव्याने टाकलेल्या १४७३ मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण केले जाणार आहे. भवानी पेठ स्वारगेट परिसर शंकर शेठ रस्ता या भागासाठी पाण्याची…