Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किन्हई, चिंचोलीत पाणीबाणी! सोमवारपासून पाणीपुरवठा विस्कळीत ;  पाणी विकत घेण्याची वेळ  

देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील चिंचोली, किन्हई व झेंडेमळा परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी  फुटल्याने सोमवारी ( दि. २८) दुपारपासून बुधवारी दोन-तीन तास वगळता अद्यापपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे.

  • By Aparna
Updated On: Dec 01, 2022 | 04:16 PM
किन्हई, चिंचोलीत पाणीबाणी! सोमवारपासून पाणीपुरवठा विस्कळीत ;  पाणी विकत घेण्याची वेळ  
Follow Us
Close
Follow Us:

देहूरोड : देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील चिंचोली, किन्हई व झेंडेमळा परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी  फुटल्याने सोमवारी ( दि. २८) दुपारपासून बुधवारी दोन-तीन तास वगळता अद्यापपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे.  या भागात बोर्डाच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारी सायंकाळपर्यंत  पाणी  टँकर पाठविले  नसल्याने पाण्याअभावी नागरिकांचे प्रचंड हाल झाले. चिंचोली भागात पाण्याचे कोणतेही स्रोत नसल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली. दरम्यान, जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असून लवकरच पाणीपुवठा सुरळीत करण्यात येईल, असे कॅंटोन्मेंट बोर्डाकडून सांगण्यात आले.

कॅन्टोन्मेंट  बोर्डाच्या वतीने स्वतंत्र नळपाणी पुरवठा पाणीयोजना २००७ साली राबवण्यात आली आहे. या योजनेतून देहूरोड परिसर, देहूरोड बाजारपेठ, मामुर्डी, शितळानगर एक व दोन, गांधीनगर, शिवाजीनगर, थॉमस कॉलनी आदी भागात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर १९८६  पासून  चिंचोली, किन्हई व झेंडेमळा या भागासाठी   एमआयडीसीकडून पाणी  विकत घेऊन बोर्डामार्फत देण्यात येते.

-जलवाहिनीला वारंवार लागते गळती
या भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी देहूरोड आयुध निर्माणीनजीक वारंवार फुटण्याचे प्रकार घडत असून  सोमवारी दुपारी  जलवाहिनी फुटली होती.  मात्र,  जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी मंगळवारी रात्री सुरुवात करण्यात आली. त्यानंतर  बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास कमी दाबाने चिंचोलीत पाणी पुरवठा सुरु झाला.  दोन -तीन तास पाणी पुरवठा  झाल्यानंतर पुन्हा जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात आले.  दुपारनंतर जलवाहिनी दुरुस्ती करण्यात आली परंतु, नळाला हंडाभर पाणी भरल्यानंतर पुन्हा पाणीपुरवठा बंद झाला. याबाबत नागरिकांनी चौकशी केली असता पुन्हा जलवाहिनी फुटली असल्याचे सांगण्यात आले.

-कर वसुलीवर भर, सुविधांकडे दुर्लक्ष
कॅंटोन्मेंट प्रशासन  कर वसुलीसाठी गाडी  भोंगे लावून सूचना दिल्या जातात. मात्र जलवाहिनी फुटल्यावर संबंधित विभागाकडून नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना देण्याची किंवा   टँकरने पाणीपुरवठा करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे कर वसुलीवर भर देण्याऱ्या कॅंटोन्मेंट प्रशासनाचे करदात्यांना सुविधा पुरविण्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याच्या भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आल्या.

-राष्ट्रवादीकडून पाण्याच्या टँकरची मागणी
दरम्यान, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव व युवा कार्यकर्ते पैलवान धनंजय सावंत यांनी  पाणीपुवठा पूर्ववत करण्यासाठी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अमितकुमार माने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले तसेच टँकर पाठविण्याची मागणी केली. त्यानुसार बुधवारी सायंकाळनंतर दोन टँकर गावात आले. परंतु , सुमारे १०  हजार लोकसंख्या असलेल्या चिंचोलीसाठी दोन टँकर अपुरे पडले. गुरुवारी काही भागात टँकर पाठविण्यात आले मात्र  बहुतांश नागरिकांना पाणी न मिळाल्याने त्यांना पाणी विकत घेण्याची वेळ आली.

[blockquote content=”कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अभियंत्यांकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच पाणीपुरवठा  सुरळीत होईल. किन्हई, चिंचोली आणि झेंडेमळा भागात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ” pic=”” name=”-राजन सावंत, कार्यालयीन अधीक्षक, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड. “]

Web Title: Water supply disrupted from monday time to buy water nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2022 | 04:16 PM

Topics:  

  • Dehuroad
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
1

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
2

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
3

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
4

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.