Ajit Pawar: 'सगळी सोंग करता येतात,पण..."; छत्रपती कारखान्याबाबत काय म्हणाले DCM अजित पवार?
बारामती: श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भविष्यात काटकसरीचे धोरण अवलंबले जाईल, निवडून येणाऱ्या संचालकांना कारखान्यामध्ये कारखान्याचे वाहन व कारखान्याचा ड्रायव्हर वापरता येणार नाही, इतरही काटकसरीचे धोरण अवलंबले जाईल, छत्रपती कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून या कारखान्याला गतवैभव मिळवून देऊ, छत्रपती शिक्षण संस्थेला देखील २५ कोटी रुपये दिले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, छत्रपती कारखान्यावर १७३ कोटींचा बोजा आहे.पुढील हंगाम सुरु करण्यासाठी ४६ कोटींची आवश्यकता आहे.त्यासाठी एेच्छीक ठेवी गोळा कराव्या लागतील. छत्रपती शिक्षण संस्था ,बापजाद्यांनी उभा केलेलं वैभव अडचणीत आहे.आपण कोणाला कमी लेखत नाही,पण विरोधकांची पार्श्वभुमी बघा, त्यांच्यापैकी कारखान्याला कोण मदत करु शकतं.राज्य सरकारसह केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आपण वेळप्रसंगी मदत घेवू शकतो. सगळी सोंग करता येतात,पण पैशांचे साेंग करता येत नाही.
कारखान्याला आपल्याला पुर्ववैभव आणण्यासाठी जास्तीत जास्त सर्व घटकांना ,वेगवेगळ्या समाजाला समावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे कोणी रुसु नका,फुगु नका.रुसुन तुमच्या ऊसाचा दर वाढणार नाही.कारखान्याला पुर्वीचे चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही तिन्ही नेते प्रयत्नांची शिकस्त करु.मात्र, त्यासाठी सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवा. या निवडणुकीत जातीपातीचे राजकारण राजकारण करु नका. येणाऱ्या काळात कारखाना सुस्थितीत आणला जाईल, छत्रपती शिक्षण संस्थेला २५ कोटी ची आर्थिक मदत करून ही संस्था नावारूपाला आणु, श्री छत्रपती कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये आणला जाईल. कारखाना कार्यस्थळावरील रस्ते व्यवस्थित केले जातील. यासाठी राज्य पातळीवरून निधीची तरतूद करू.
यावेळी क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, निवडणुकीसाठी इच्छुक सर्वच उमेदवार तुल्यबळ होते.मात्र, २१ जणांनाच उमेदवारी देणं शक्य होते. असताना देखील उमेदवारी देता आली नाही..त्यामुळे कोणी गैरसमज करुन घेवू नये,अफवांना बळी पडु नका, कोणी कुठल्याही अफवा मोबाईलच्या माध्यमातून पसरवेल, मात्र त्यावर विश्वास ठेवू नका, हा साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे भरणे म्हणाले.