Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Naik News: ‘..तर शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकू’; गणेश नाईकांनी पुन्हा एकनाथ शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळलं

सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती, तर ताकदीनुसार पदे मिळाली असती, असे वैयक्तिक मत मांडतानाच कार्यकर्त्यांनी कठीण परिस्थितीतही पाळलेली पक्षशिस्त कौतुकास्पद असल्याचे नाईक यांनी नमूद केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 26, 2026 | 11:10 AM
Thane Politics, Ganesh Naik, Eknath Shhinde, Thane Municipal Election 2026,

Thane Politics, Ganesh Naik, Eknath Shhinde, Thane Municipal Election 2026,

Follow Us
Close
Follow Us:
  • एकनाथ शिंदे आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यातील राजकीय वैर
  • भाजपाने परवानगी दिली, तर यांचे (शिंदेसेना) नामोनिशाण संपवून टाकू- गणेश नाईक
  • भाजप हा शिस्तीचा पक्ष असून कार्यकर्त्यांनी आदेश पाळला
Ganesh Naik on Eknath Shinde:  मागील काही काळापासून ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यात वाद सुरू होता. महापालिका निवडणुकीतही एकनाथ शिंदे विरूद्ध गणेश नाईक असा सामना रंगला होता. निवडणुकीनंतर हा वाद संपेल असेही बोलले जात होते. पण हा वाद दिवसेंदिवस अधिक पेटत चाललााहे. अशातच वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंविरोधात एक खळबळजनक विधान केलं आहे, त्यामुळे ठाण्यात पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Padma Awards 2026: उदय कोटक आणि सत्यनारायण नुवाल यांच्यासह ‘या’ प्रमुख उद्योगपतींना केले सन्मानित

“भाजपाने परवानगी दिली, तर यांचे (शिंदेसेना) नामोनिशाण संपवून टाकू. मी आज परत बोलतोय.” असा थेट इशारा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना दिला आहे. पण त्याचवेळी ” भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे पक्षाने आदेश दिला म्हणून आम्ही ते मान्य केलं. मनाला पटलं नसलं तरीही कार्यकर्त्यांनी सहन केलं. आम्ही पक्ष नेतृत्त्वाचा निर्णय मान्य केला. असही गणेश नाईक यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीही मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात महायुतीतीतल सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यावे, निवडणुकीनंतर ज्यांचे जास्त नगरसवेक निवडून येतील त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि उर्वरित पदाची वाटणी केली जावी, अशी माझी मागणी होती.” असही नाईक यांनी नमुद केलं.

यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सांगितलं होतं. पण त्यांनी त्यावेळी होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही. कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती. असंही नाईक म्हणाले.

‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचाच..; कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून संजय राऊतांनी भाजपवर तोफ डागली

दरम्यान, जागावाटपावेळी शिवसेनेकडून ५७ जागांची मागणी करण्यात आली होती. पण आम्ही २० ते २२ जागा देण्यासाठी तयार होतो. शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू होत्या. त्यानंतर त्यांनीही एबी फॉर्म भरले आणि आणि आम्ही भरले. त्यानंतर जे झालं ते चांगलच झालं. असा टोलाही नाईक यांनी लगावला. ठाण्यातील लोकांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. ठाण्यात भाजपच्या घोड्यांचे लगाम खेचेले गेले, कल्याणमध्येही तसेच झाले, पण त्यानंतरही जे पक्षाला मान्य होतं. ते आम्ही मान्य केलं.

“भाजप हा शिस्तीचा पक्ष असून कार्यकर्त्यांनी आदेश पाळला असला तरी ठाणे, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीत त्यांची परवड झाली आहे,” असे   मत   गणेश नाईक यांनी व्यक्त केले. सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती, तर ताकदीनुसार पदे मिळाली असती, असे वैयक्तिक मत मांडतानाच कार्यकर्त्यांनी कठीण परिस्थितीतही पाळलेली पक्षशिस्त कौतुकास्पद असल्याचे नाईक यांनी नमूद केले.

Web Title: We will wipe out all traces of the shiv sena said ganesh naik issuing a warning to eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Ganesh Naik

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.