भगतसिंह कोश्यारींना 'पद्मभूषण' मिळताच संजय राऊतांची भाजपवर खोचक टीका
Sanjay Raut Criticized BJP Government: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, या निर्णयावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी संजय राऊत यांनी ट्विटर एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत थेट भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
” महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान! ” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. उद्या दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. (Sanjay Raut)
भारतातील सर्वात जलद T20 अर्धशतक; अभिषेक शर्माने मोडला हार्दिक पंड्याचा विक्रम, इतिहास रचला!
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे २०१९ ते २०२३ या काळात कार्यरत होते. पण या पाच वर्षांत विविध विधानांमुळे आणि राजकीय घडामोडींमुळे त्यांची कारकिर्द कायमच वादग्रस्त राहिली. मुंबई, महाराष्ट्र, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरही वादग्रस्त विधाने केली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार असताना कोश्यारींवर ‘समांतर सरकार’ चालवत असल्याचाही आरोप झाला.
भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जुन्या काळातील आदर्श’ असे संबोधले आणि त्यांची तुलना आधुनिक काळातील नेत्यांशी केली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहाबद्दल टिप्पणी करताना त्यांचे हसणे आणि “लहान वयात मुले लग्नानंतर काय करत असतील?” असे विधान करणे अपमानकारक मानले गेले. “समर्थ रामदासांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?” असे विधान करून त्यांनी महाराजांच्या कर्तृत्वापेक्षा गुरुंचे स्थान मोठे असल्याचे सुचवल्याचा आरोप झाला.
Todays Gold-Silver Price: किंचीत घसरले सोन्याचे दर, चांदीही नरमली! खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढून टाकले, तर मुंबई महाराष्ट्राकडे पैसेच उरणार नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखच उरणार नाही,” असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.
पहाटेचा शपथविधी: २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट अचानक हटवून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पहाटे दिलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ अत्यंत वादग्रस्त ठरली.
१२ आमदारांची नियुक्ती: महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीची फाईल त्यांनी प्रदीर्घ काळ प्रलंबित ठेवली, ज्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात सतत संघर्ष राहिला.
उद्धव ठाकरे सरकार कोसळताना आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर येताना घेतलेल्या निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले होते. या सातत्यपूर्ण वादांमुळेच विरोधकांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली होती, ज्याची परिणती अखेर फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या राजीनाम्यात झाली.
महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले
याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता!
महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते!
छान! pic.twitter.com/5xrZ0u6c9q — Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2026






