
Maharashtra Winter Alert: रेनकोट काढून स्वेटर घाला! राज्यात हुडहुडी वाढणार; 'या' दिवसापासून....
राज्यात लवकरच थंडी पडणार
राज्यातून पाऊस माघारी जाणार
तापमानात घट होण्याची शक्यता
Maharashtra Weather: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस सुरू आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पवससाठी पोषक हवामान तयार झाले आहे. दरम्यान राज्यातील नागरिक थंडी कधी पडणार याची वाट बघत आहेत. दरम्यान राज्यात लवकरच थंडी पडायला सुरुवात होणार आहे.
भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. राज्यात लवकरच गारठा पडणार आहे. लवकरच थंडी पडायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच पाऊस अखेर थांबणार आहे. राज्यात थंडीसाठी अनुकूल हवामान तयार होत असल्याचे समोर आले आहे. मुंबई, पुणे आणि अन्य काही शहरांमधील तापमानात घट होण्यास सुरुवात होणार आहे.
खरे तर हा महिना थंडीचा महिना समजला जातो. मात्र हवामानातील बदलामुळे राज्यात पावसाने कहर केल्याचे दिसून येत आहे. मात्र आता नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच थंडी पडण्यास सुरुवात होणार आहे. सकाळच्या वेळेस हवेत धुक्याचे प्रमाण दिसून येत आहे.
हिवाळ्यात ‘या’ पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका
हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनसंस्था संतुलित ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. थंड, तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ शरीराला उष्णता देत नाहीत, उलट रोगप्रतिकारक शक्ती कमी करून आजारपणाची शक्यता वाढवतात. त्यामुळे या काळात काही पदार्थ मर्यादित प्रमाणात किंवा पूर्णपणे टाळलेलेच बरे. थंड पदार्थ आणि पेय पदार्थ जसे की बर्फासह पाणी, थंड पेय, थंड दूध किंवा दही, आईस्क्रीम, फ्रोजन डेझर्ट्स हे शरीराचे तापमान कमी करून पचनसंस्था कमजोर करतात. हिवाळ्यात अशा पदार्थांऐवजी कोमट पाणी, सूप किंवा गरम दूध घेणे फायदेशीर ठरते.
तसेच अतितळलेले व जड पदार्थ जसे की समोसे, भजी, फ्रेंच फ्राईज हे पचायला कठीण असतात आणि गॅस, फुगवटा व सुस्ती निर्माण करतात. परिष्कृत साखर आणि गोड पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात, तर फास्टफूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि बेकरी पदार्थांमधील अस्वास्थ्यकर चरबी शरीरात सूज वाढवतात. अति दुग्धजन्य पदार्थ जसे दूध, चीज, क्रीम हे कफ तयार करणारे असतात, त्यामुळे ज्यांना वारंवार सर्दी-खोकला होतो त्यांनी यांचे सेवन मर्यादित करावे. तसेच टोमॅटो, पालक आणि आंबवलेले पदार्थ हे हिस्टामिनयुक्त असल्याने कफ आणि बंद नाक वाढवतात.