आतून सडलेली किडनी स्वच्छ करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
मानवी शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी रक्त शुद्ध करते, यासोबतच शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम देखील किडनीचं करते. त्यामुळे शरीर दीर्घकाळ निरोगी आणि हेल्दी ठेवण्यासाठी किडनी स्वच्छ करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. शरीरातील विषारी घटक किडनीमध्ये तसेच साचून राहिल्यामुळे ओटीपोटात वेदना होणे, रक्त शुद्ध करण्यात अडथळे येणे, शरीरातील विषारी घटक बाहेर पडून न जाणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे किडनी स्वच्छ असणे आवश्यक आहे. किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर काहीवेळा डायलेसिस करण्याची सुद्धा वेळ येते. त्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्याही गंभीर समस्या उद्भवू नये म्हणून आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला किडनी स्वच्छ करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
सर्वच स्वयंपाक घरात लसूण उपलब्ध असते. लसूणचा वापर जेवणातील पदार्थाना फोडणी देण्यासाठी केला जातो. यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. लसूण खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म किडनीला आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय उपाशी पोटी नियमित एक लसूण चावून खाल्यास किडनीमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता वाढवण्यासाठी लसूण खावी. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही लसूण चटणी किंवा लसूण घालून बनवलेले पदार्थ बनवून खाऊ शकता.
शरीरासाठी हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये ‘कर्क्युमिन’ नावाचा गुणकारी घटक आढळून येतो. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक किडनीमधील घाण बाहेर काढून टाकतात. हळद त्वचेसाठी अतिशय गुणकारी ठरते. हळदीमध्ये असलेल्या घटकांमुळे सर्दी, खोकला आणि आरोग्यासंबंधित इतरही अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये काकडी आवर्जून खाल्ली जाते. काकडीमध्ये भरपूर पाणी असते, ज्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. काकडी खाल्ल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. याशिवाय आहारात लिंबू पाण्याचे नियमित सेवन करावे. लिंबू पाणी प्यायल्यामुळे किडनीमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते.
आतून खिळखिळी झाली हाडं, मिळतील 3 संकेत; सांगडा होण्यापूर्वी 4 कामं
किडनीची रचना आणि कार्य काय आहे?
किडनींचा आकार काजूसारखा असतो.त्या शरीरातील रक्त साफ करून मूत्राची निर्मिती करतात. हे मूत्र मूत्राशय आणि मूत्रमार्गाद्वारे शरीराबाहेर टाकले जाते.
किडनी खराब होण्याची लक्षणे कोणती?
सामान्यतः किडनीचे कार्य व्यवस्थित चालू असताना तुम्हाला सामान्य प्रमाणात लघवी होते आणि फिकट पिवळ्या रंगाचे मूत्र होते. जेव्हा किडनी खराब होते, तेव्हा सूज येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
किडनी स्टोन म्हणजे काय?
किडनी स्टोन हे किडनीमध्ये तयार होणारे कठीण खडे असतात.लहान खडे मूत्रावाटे बाहेर पडू शकतात, पण मोठे खडे मूत्रमार्गात अडथळा निर्माण करून तीव्र वेदना देऊ शकतात.