
7 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम
दिवाळी संपली तरी अनेक ठिकाणी पाऊस
महाराष्ट्रात पावसाचा काळ वाढला
Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. ऐन दसरा, दिवाळीत देखील राज्यात पावसाने कहर केल्याचे दिसून आले. आता नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान राज्यात पुस आणखी काही दिवस कोसळणार असल्याचे म्हटले जात आहे. हवामान विभागाने कोणता इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसामुळे शेतीमालाचे, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान विभागाने आज देखील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात अला आहे.
यंदा राज्यात पावसाला लवकर सुरुवात झाली. तसेच सणासुदीच्या काळात देखील; पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर कायम आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसाचा मुक्काम 7 नोव्हेंबरपर्यंत
दिवाळी संपली तरी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरुच आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा काळ वाढला असून 7 नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज केवळ राज्यातच नव्हे तर देशातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवस राज्यात पाऊस राहण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये म्हणजेच मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अवकाळीने हिरावला हातचा घास
तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०८ शेतकऱ्यांचे सुमारे ९३.०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. तालुक्यात मे ते सप्टेंबर या पाच महिन्याच्या कालावधीतही पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात एकूण ४७.७५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती. त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यातही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. मात्र सप्टेंबर अखेर पासून सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपिक पुन्हा बाधित झाले आहे. गेल्या आठवड्याभरात संध्याकाळच्या सरीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली. तर काही ठिकाणी भाताचे रोप पूर्ण तुटून चिखलात गेली आहेत.