हवामान बदलाचा कोकणच्या अर्थव्यवस्थेला फटका (फोटो- istockphoto)
हवामान बदलाचा कोकणाला फटका
१५ वर्षांत पश्चिम किनाऱ्याला सातत्याने वादळी हवामानाचा फटका
व्यवसायातील आर्थिक वृद्धीला बसली खीळ
गुहागर: हवामान बदल आता ही केवळ चर्चेतली संकल्पना राहिलेली नाही. त्याचा फटका जगाला कोणत्या ना कोणत्या आपत्तीच्या रुपाने बसतो आहे. आपला कोकण विभागही त्यास अपवाद राहिलेला नाही. मागील १५ वर्षांत देशाच्या पश्चिम किनाऱ्याला सातत्याने वादळी हवामानाचा फटका बसतो आहे. यावर्षी मे महिन्याच्या मध्यावरच पावसाने जोरदार बँटींगला सुरुवात केल्याने कोकणातील मासेमारी, पर्यटन, शेती, खाणकाम आदी प्रमुख व्यवसायांचे आर्थिक गणित कोलमडून गेले होते. आता ऐन दिवाळी हंगामातही वादळी हवामानामुळे कोकणातील मासेमारी, पर्यटन व शेतीला व्यवसायातील आर्थिक वृद्धीला खीळ बसली आहे.
हवामान बदलाचे उमटू लागले पडसाद
हवामान बदल हा विषय आता फक्त चर्चेचा आणि संशोधनाचा राहिला नसून दैनंदिन जीवनात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
अन्य राज्यांमधील नौका आल्या आश्रयासाठी
हवामान बदलाचे समाजस्वास्थ्यावर आणि कोकणातील अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होत आहेत, याची नोंद सरकारने घेण्याची वेळ आली आहे. वादळी हवामानामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील मासेमारी ठप्प झाली आहे. कोकणसह अन्य राज्यामधील अनेक मासेमारी नौका सिंधूदुर्ग व रत्नागिरी जिल्हयातील बंदरांमध्ये आश्रयासाठी आल्या आहेत. वादळी हवामानामुळे मासेमारीला सातत्याने ‘ब्रेक’ लागतो आहे. मासेमारीचे महत्वाचे तास वाया जात आहेत. मोठे ट्रॉलर्स त्यानुसार सरकारने धोरणात्मक व कार्यात्मक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
Cyclone Montha: ‘मोंथा’मुळे समुद्र भयानक खवळला; २४ तासांत कोकणात मुसळधार, किल्ल्याकडे जाणारी होडी…
ठिकठिकाणी उभे पीक आडवे झाल्याचे चित्र
हवामान बदलामुळे कोणत्या उपजीविका धोक्यात आल्या आहेत. त्यांना पर्याय काय असू शकतील, याचा अभ्यास होण्याची गरज आहे. तसा अभ्यास झाला असेल तर त्यावर आधारित उपक्रम लोकसहभागातून यशस्वी झाले पाहिजेत. कोकणातील शेतकऱ्यांच्या मातपीकाची मोठी हानी झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक गमवावे लागल्याने अनेक शेतकरी निराश झाले आहेत, ठिकठिकाणी उभे पीक आडवे झाल्याचे चित्र आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा मातपीकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
मासेमारीला व्यवसायाला बसतोय जबर फटका
मासेमारी नौका बंदरात विसावल्यानंतर काही छोटे पारंपरिक मच्छीमार वादळवाऱ्याचा सामना करत मासेमारीस जात आहेत. वादळामुळे बाजारात ताज्या माशांची आवक घटल्याने आपल्या माशांना चांगला भाव मिळेल, या विचाराने ते मासेमारी करत आहेत. कारण इतरवेळी अवैध एलईडी पर्ससीनच्या अतिक्रमणामुळे आपल्या माशांना अपेक्षित माय मिळत नाही. आपला व्यवसाय तोट्यात जातो. म्हणून वादळवाऱ्यांमध्ये जीवावर उदार होऊन आम्ही मासेमारीस जातोय, असे त्यांचे म्हणणे आहे.






