Western Central Harbour Railway Line mumbai local delay mega block on republic day
मुंबई : देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह आहे. संपूर्ण देशामध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला जातो आहे. मात्र मुंबईकरांनी मोठी तारांबळ उडाली आहे. अनेक कार्यालय, शाळांमध्ये आणि शासकीय पातळीवर ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले होते. मात्र मुंबईकरांना कार्यक्रमांना पोहचता आले नाही. मुंबईची मुख्य वाहिनी असलेली लोकल रेल्वे सेवा ठप्प पडल्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवरील रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. यामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
मस्जिद बंदर येथे कर्नाक पूलावर गर्डर बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक बाधित झाली आहे. काल रात्री (दि.25) पासून हे काम सुरु होते. मस्जिद बंदर येथे कर्नाक पूलावर गर्डर बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक बाधित झाली आहे. अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली नाही. दादर रेल्वे स्थानकाच्या अलीकडे एकामागोमाग लोकल थांबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी ट्रॅकवर उतरून पायी चालत जात आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शनिवारी रात्री गर्डर टाकण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर हे काम निहित वेळेत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बाधित झाली आहे. याबाबत मध्य रेल्वेने सोशल मीडिया पोस्ट करुन माहिती दिली आहे. र्नाक पूलासाठी घेतलेला मेगा ब्लॉक संपला नसल्याचे सांगितले आहे. भायखळा ते दादर लोकल सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच हार्बर मार्गावरील वाहतूक केवळ वडाळा स्थानकापर्यंतच सुरू आहे. सीएसएमटी, दादर, वडाळा आणि भायखळा स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी बसेसची व्यवस्था सुरू करण्यात आलेली असल्याची माहिती मध्य रेल्वेने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच पश्चिम रेल्वेवर वांद्रे ते माहिम दरम्यान शनिवारी आणि रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यासाठी विरार-बोरीवलीहून निघालेल्या लोकल सकाळपर्यंत फक्त अंधेरी स्थानकापर्यंत धावत होत्या. त्यामुळे शनिवारप्रमाणेच आजही अंधेरी स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. थोड्यावेळापूर्वीच पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत केल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.