Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Cabinet expansion : CM देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप; १० मंत्री घेणार आजच शपथ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर वगळता चारही जिल्ह्यांचे प्रतिनिधी नव्या मंत्रिमंडळात दिसतील. सातारा, सांगली, पुणे व कोल्हापूरमधील अनेक आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 15, 2024 | 03:50 PM
'आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी महायुतीने एकत्र लढावे'; शिंदे गटाच्या आमदाराची अपेक्षा

'आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी महायुतीने एकत्र लढावे'; शिंदे गटाच्या आमदाराची अपेक्षा

Follow Us
Close
Follow Us:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी आज नागपूरमध्ये पार पडणार आहे. त्याआधी सकाळपर्यंत संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. अजूनही कोणत्याही पक्षाने मंत्र्यांची नावे अधिकृतरित्या जाहीर केलेली नसली तरी काही आमदारांनी त्यांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन आल्याचं सांगितलं आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप दिल्याचं दिसत आहे. तीन जिल्ह्यांमधून तब्बल १० जणांना फोन गेला आहे. तर आणखी काही नावं पुढे येण्याची शक्यता आहे.

सोलापूर वगळता इतर चारही जिल्ह्यांचे प्रतिनिधी नव्या मंत्रिमंडळात दिसतील. सातारा, सांगली, पुणे व कोल्हापूरमधील अनेक आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचं मंत्रिपद कायम राहण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर यांना संधी दिली जाणार आहे. तर पुण्यातून तीन नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. यामध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील व माधुरी मिसाळ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दत्ता भरणे यांना संधी जाणार आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा पाहायला मिळू शकतो.

साताऱ्याचे चार आमदार मंत्री होणार?

साताऱ्यात भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले. अजित पवारांच्या पक्षाकडून मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे या दोन आमदारांचा आज शपथविधी पार पडू शकतो. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचं मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे. देसाई देखील आज मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

दरम्यान छगन भुजबळ, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर आणि सुधीर मुनगंटीवार या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची तथा तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नावं फडणवीसांच्या मंत्रिमंडळ नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, वर्ध्याचे भाजपाचे आमदार पंकज भोयर यांना संधी मिळणार आहे. यासह काही नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. रवींद्र चव्हाण हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

भाजपच्या या मंत्र्यांना मिळणार मंत्रिपद

1. चंद्रशेखर बावनकुळे
२. आशिष शेलार
३. राधाकृष्ण विखे पाटील
४. पंकजा मुंडे
५. गिरीश महाजन
६. नितेश राणे
७. शिवेंद्रराजे भोसले
८. चंद्रकांत पाटील
९. पंकज भोयर
१०. मंगलप्रभात लोढा
११. जयकुमार रावल
१२. गणेश नाईक
१३. मेघना बोर्डीकर
१४. अतुल सावे
१५. जयकुमार गोरे
१६. माधुरी मिसाळ
१७. संजय सावकारे
१८. अशोक उईके
१९. आकाश फुंडकर

राष्ट्रवादीच्या या नेत्यांना मिळणार मंत्रिपद

१. धनंजय मुंडे
२. हसन मुश्रीफ
३. नरहरी झिरवाळ
४. आदिती तटकरे
५. बाबासाहेब पाटील
६. दत्तमामा भरणे
७. मकरंद पाटील
८. इंद्रनील नाईक
9. माणिकराव कोकाटे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या राजभवनात दुपारी तीननंतर शपथविधी होणार असून राजभवनाच्या प्रशस्त लॉनवर जोरदार तयारी सुरू आहे. 1991 मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता. त्यानंतर 33 वर्षांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात होत आहे.

Web Title: Western maharashtra gets supremacy in mahayuti cabinet expansion 10 minister today take oath in nagpur rajbhavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 03:24 PM

Topics:  

  • Cabinet Expansion
  • CM Devendra Fadnavis
  • maharashtra cabinet expansion

संबंधित बातम्या

Shrimant Dagdusheth Halwai मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
1

Shrimant Dagdusheth Halwai मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

“देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं,” मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा भडकले!
2

“देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं,” मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा भडकले!

खारघरमध्ये उभारले जाणार भारत-आफ्रिका जागतिक व्यापार केंद्र; ‘गांधी-मंडेला कन्व्हेन्शन सेंटर’ ठरणार आकर्षण
3

खारघरमध्ये उभारले जाणार भारत-आफ्रिका जागतिक व्यापार केंद्र; ‘गांधी-मंडेला कन्व्हेन्शन सेंटर’ ठरणार आकर्षण

CM Devendra Fadnavis यांची बुलेटवरून विधानभवन परिसरात दमदार एंट्री, सुरक्षारक्षकांचासुद्धा सोबत बाईकने प्रवास
4

CM Devendra Fadnavis यांची बुलेटवरून विधानभवन परिसरात दमदार एंट्री, सुरक्षारक्षकांचासुद्धा सोबत बाईकने प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.