Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैभव गायकवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालायने फेटाळला, राजकीय परिमाण काय ?

  • By Rahul Gupta
Updated On: Mar 27, 2024 | 04:01 PM
वैभव गायकवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालायने फेटाळला, राजकीय परिमाण काय ?
Follow Us
Follow Us:

कल्याण (अमजद खान) : गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांचा अटक पूर्व जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर आमदार सुपुूत्राचा जामीन अर्ज फेटाळल्यावर त्याचा राजकीय परिमाण काय होणार आहे. याची चर्चा आता रंगली आहे. भाजप आणि शिवसेनेतील वाद दूर करण्यासाठी एकीकडे खासदार शिंदे आणि मंत्री रविंद्र चव्हाण प्रयत्नशील आहेत. मात्र वैभव गायकवाड यांचा जामीन अर्ज रद्द केल्याने भाजपशी शिवसेनेचे मनोमिलन होणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

द्वारली गावातील जागेच्या वादातून भाजप आमदार गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. ही घटना हिललाईन पोलिस ठाण्यात घडली होती या घटनेपश्चात आमदार गायकवाड यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. प्रथम पोलिस कोठडी मिळाली. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. ते सध्या तळोजा कारागृहात आहेत. या प्रकरणात आमदार गायकवाड यांचे सुपुत्र वैभव हे देखील आरोपी आहे. घटना घडल्यापासून ते फरार आहे. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर काल कल्याण न्यायालयात तब्बल तीन तास सुनावणी पार पडली. मात्र न्यालायाने त्यांच्या अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. आज त्यांच्या अर्जावर निकाल दिला आहे. त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे वैभव यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यावर वैभव गायकवाड हे उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करु शकता अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही दिवसापूर्वी दिव्यातील भाजपचे पदाधिकारी सचिन भोईर यांनी कल्याण लोकसभा भाजपच्या चिन्हावर लढविली गेली पाहिजे असे विधान केल्यावर खासदार शिंदे यांच्यासह भाजप मंत्री चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी बैठक घेतली. कल्याण पूर्व विधान सभेत हे मनोमिलन झाले की नाही हे आत्ता निवडणूकीत स्पष्ट होणार आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर त्याचा युतीवर काय परिमाण होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: What is the political dimension of vaibhav gaikwads pre arrest bail application rejected by the court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2024 | 04:01 PM

Topics:  

  • BJP
  • Vaibhav Gaikwad

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
3

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
4

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.