कल्याण (अमजद खान) : गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांचा अटक पूर्व जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर आमदार सुपुूत्राचा जामीन अर्ज फेटाळल्यावर…
२ फेब्रुवारी रोजी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात द्वारली येथील जागेच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदावर गोळीबार केला…
३ फेब्रुवारीला हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या दालनाचं शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे साथीदार राहूल पाटील आणि चैनू जाधव यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.
महेश गायकवाड यांच्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. यानंतर या प्रकरणातील दुसरे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.