Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: तुम्हाला भीती वाटण्याचं कारण काय….: अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यावरुन संजय राऊत

रामदास कदम यांच्यासारखे किरकोळ लोक ज्यांनी बाळासाहेबांच्या जिवावर आयुष्यभर खाल्ल आणि इमले उभे केले, तेच लोक बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना करतात. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे, ते निर्लज्ज आहेत

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 05, 2025 | 01:20 PM
Sanjay raut news

Sanjay raut news

Follow Us
Close
Follow Us:
  • अमित शहांचा अहिल्यानगरमधील दौरा
  • नगर जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांना अटक
  • जेव्हापासून देशावर गुजरात मॉडेल राज्यात आले आहे. त्यांना देशात आंदोलने नको आहेत.

Sanjay Raut News:  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा अहिल्यानगरमधील राहाता आणि कोपरगाव तालुक्याचा दौरा सुरू केला आहे. ते काल रात्रीच राहाता येथे मुक्कामी दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्य मंत्रिमंडळासोबत त्यांनी एकत्रित भोजन घेतले. पण शाहांच्या या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे.

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

“देशाचे निधड्या छातीचे गृहमंत्री,कश्मीरमधून ३७० कलम हटवणारे, मुंबईत शिवसेनेशी दोन हात करू पाहणारे, निवडणूक आयोगाच्या मदतीने शिवसेना फोडून दाखवणारे, सोनम वांगचूक यांना अटक कऱणारे असे आपले गृहमंत्री अमित शाह आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यांच्या दौऱ्याआधी नगर जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांना अटक केली आहे.त्यांनी कोणत्याही प्रकारे आंदोलन करू नयेत, काळे झेंडे दाखवू नयेत. शिवसेनेचे पदाधिकारी भरत मोरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांना त्यांच्या दौऱ्यापूर्वी अटक केली आहे. अटक करुन त्यांना अज्ञात स्थळी ठेवलं आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्ते, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनाही नोटीसा बजावल्या आहेत. काहींना अटक केली आहे. कसली भीती वाटते तुम्हाला, तुम्हा सोनम वांगचूक यांची भीती वाटते, मणिपूरच्या महिलांची भीती वाटते. महाराष्ट्रातील शिवसैनिकांची भीती वाटते. तुम्ही देशाचे गृहमत्री आहात, मग तुम्हाला इतकी भीती वाटण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तुम्ही अद्याप मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या नुकसानीची कारवाई कऱण्यासाठी कोणी गेलं नाही, याचीही तुम्हाला भीती आहे. शेतकरी येऊ देणार नाहीत, ते अंगावर येतील,जे आंदोलनाला घाबरतात, अशा भयग्रस्त नेत्यांना राज्य कऱण्याचा अधिकार आहे का, अशा नेत्यांनी राज्यच करू नये, अशा घणाघातही राऊतांनी केला आहे. “मुंबईत मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, या सर्वांच्या गाड्यांसमोर आंदोलने झाली आहेत. हे महाराष्ट्रात होत आलेलं आहे.’ असही संजय राऊत यांनी सांगितलं. पण जेव्हापासून देशावर गुजरात मॉडेल राज्यात आले आहे. त्यांना देशात आंदोलने नको आहेत. त्यांना भीती वाटत आहे. काही कारण नसताना तुम्ही कार्यकर्त्याना अटक करताय, त्यांना स्थानबद्ध करताय, तुम्ही गृहमंत्री असाल, तर निर्भिडपणे लोकांना सामोरे जा, त्यांचे प्रश्न ऐका. हा पळपुटेपणा कशाला करता, महाराष्ट्राचे गृहमंत्रीही तसेच वागत आहेत. फक्त विरोधकांना अटक करणे त्यांना तुरुंगात टाकणे ऐवढचं सुरु आहे.” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Kantara: Chapter 1: ‘कांतारा’ समोर सगळे चित्रपट फेल, तिसऱ्या दिवशीच १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्याबाबात विचारले असता, संजय राऊत म्हणाले, ” रामदास कदम यांच्यासारखे किरकोळ लोक ज्यांनी बाळासाहेबांच्या जिवावर आयुष्यभर खाल्ल आणि इमले उभे केले, तेच लोक बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना करतात. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे, ते निर्लज्ज आहेत. त्यांची विटंबना करता आणि त्यांचेच फोटो लावता. नारायण राणेंनी त्यांच्या पोरांना आवरावं, तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी, सत्ता येते सत्ता जाते. पण लोक तुम्हाला धुतल्याशिवाय राहणार नाहीत. रामदास कदमां यांच्या पत्नीसंदर्भात अनिल परब यांनी काल जे भाष्य केलं आहे ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या घटनेचीही चौकशी झाली पाहिजे. तुम्ही बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर काय झालं याबद्दल बोलत आहात, तुमची लायकी तरी आहे का, आमच्या अंगावर आलात तर याद राखा,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तसेच, अनिल परबांकडे स्फोटकांचा अजून मोठा साठा पडला आहे. मला माहिती आहे तो काय आहे. तुम्हाला रस्त्यावर तोंड दाखवण मुश्किल होईल. यांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस वाचवणार नाहीयेत. ज्यांनी ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंसर्भात अशी दळभद्री वक्तव्ये केलीत, त्यांना कोणीही वाचवणार नाही. मुळात अमित शाहा आणि नरेंद्र मोदी यांची काय अवस्था होणार आहे, हे आम्हाला माहिती आहे.” असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Web Title: What is the reason for you to be afraid sanjay raut gets angry over the detention of workers before amit shahs visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 12:36 PM

Topics:  

  • sanjay raut

संबंधित बातम्या

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
1

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
2

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल
3

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार
4

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.