
Sanjay Raut, K Annamalai, Marathi vs non-Marathi row, Mumbai municipal elections,
दरम्यान, तामिळनाडूचे भाजप नेते के. अण्णामलाई यांनी प्रचारादरम्यान एका मुलाखतीत बोलताना म्हणाले होते की, ” बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराच्या महापालिकेचे बजेटच ७५ हजार कोटी इतके आहे. चेन्नई आणि बंगळुरूचे बजेच १९ हजार कोटींचे आहे. त्यामुळए या शहरांचे नियोजन करण्यासाठी चांगल्या सरकारची गरज आहे.” असे म्हटले. पण अण्णामलाई यांच्या याच विधानावरून संजय राऊत यांनी भाजपवर आगपाखड केली आहे.
संजय राऊत यांना पत्रकार परिषदेवेळी अण्णामलाई यांच्याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे यावर काय म्हणणं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काय म्हणणे आहे, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही, असं फडणवीस म्हणत असतात, पण गर्जना चांगली असली तरी त्यांच्याच पक्षाचे नेते महाराष्ट्रात येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही, असे म्हणतात. यावर त्यांनी आधी उत्तर दिले पाहिजे.
ते म्हणाले की,अन्नामलाई येऊन म्हणतात की मुंबई महाराष्ट्राच्या लोकांची नाही. जर मुंबई महाराष्ट्राच्या लोकांची नाही, तर ती कोणाची आहे? ती पाकिस्तान, बांगलादेश किंवा मलेशियाच्या लोकांची आहे का? आता हे माहित नाही की अन्नामलाई मुंबईत आहेत की कदाचित ते भीतीपोटी पळून गेले.
‘तू मारल्यासारखे कर, मी…’! टीकेची झोड उठताच BJP ला शहाणपण; आरोपी आपटेचा घेतला राजीनामा
“मुंबई महाराष्ट्राची नाही, असे विधान भाजपाचे स्टार प्रचारक करत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. अण्णामलाई जर असे बोलत असतील, तर त्यांच्या विरोधात राज्यात गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजधानीविषयी अशा प्रकारचे विधान कसे काय केले जाऊ शकते, असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी १०६ हुतात्म्यांचा अवमान झाल्याचा आरोप केला.
“मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान भाजपाचे अण्णामलाई यांनी केला असेल, तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी. भाजपावर जोरदार टीका करत संजय राऊत यांनी “कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा?” असा सवाल उपस्थित केला.