Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Mahajan : “युती तोडून उबाठाला महाविकास आघाडीत बसवण्याची किती दलाली घेतली”, प्रकाश महाजन यांची संजय राऊतवर खरमरीत टीका

मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ७ पैकी ६ नगरसेवक किती पैसे देऊन फोडले, त्यासाठी कोणत्या गुजराती कंत्राटदाराकडून पैसे घेतले, असे सवाल प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांना केल

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 09, 2026 | 03:42 PM
"युती तोडून उबाठाला महाविकास आघाडीत बसवण्याची किती दलाली घेतली", प्रकाश महाजन यांची संजय राऊतवर खरमरीत टीका

"युती तोडून उबाठाला महाविकास आघाडीत बसवण्याची किती दलाली घेतली", प्रकाश महाजन यांची संजय राऊतवर खरमरीत टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल
  • राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसवण्यासाठी किती दलाली
  • प्रकाश महाजन यांची उबाठा खासदार संजय राऊतांवर टिका
मुंबई : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल असताना त्यातून उबाठाला बाहेर काढून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसवण्यासाठी किती दलाली घेतली, अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उबाठा खासदार संजय राऊत यांच्यावर केली. शिवसेनेवर खोक्यांचे आरोप करणाऱ्या उबाठा आणि राऊत यांचा महाजन यांना कडक शब्दांत समाचार घेतला.

बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश महाजन यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ७ पैकी ६ नगरसेवक किती पैसे देऊन फोडले, त्यासाठी कोणत्या गुजराती कंत्राटदाराकडून पैसे घेतले, असे सवाल महाजन यांनी राऊत यांना केले. खोक्याची भाषा बोलणाऱ्यांना पैशांशिवाय काही दिसत नाही, अशी टीका महाजन यांनी ठाकरेंवर केली. राऊत २५ वर्ष खासदार असताना त्यांनी मराठी माणसासाठी केलेली किमान पाच दाखवावी, अशी टीका महाजन यांनी केली. एकनाथ शिंदेंवर आरोप करणारे राऊत हा खासदारच्या रुपात दिल्लीच्या वर्तुळात वावरणारा दलाल आहे, अशी घणाघाती टीका महाजन यांनी केली. राऊत यांची कॉलर धरणारी महिला कोण, असा सवाल महाजन यांनी केला.

Raigad News: प्रभागात केलेल्या विकासाकामांमुळेच आम्ही विजयी होऊ; महायुतीच्या उमेदवारांनी केला दावा

उबाठा मुख्यमंत्री होण्यासाठी पदयात्रा करणाऱ्या दिवंगत चिंतामण रुईकर या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची उबाठाला भेट घ्यायला वेळ मिळाला नाही. मात्र याच रुईकर कुटुंबासाठी घर बांधून देण्याचे काम एकनाथजी शिंदे यांनी केले, असे महाजन म्हणाले. शिंदेंना द्यायचे माहित आहे तर ठाकरेंना घ्यायचे माहित आहेत, असे ते म्हणाले. महायुतीत कोणतीही कुरबुरी नाही, तिन्ही भाऊ मजबुतीने सरकार चालवत आहेत, असे महाजन म्हणाले. मुंबई तोडणार याच गोष्टीवर मागील ३० वर्ष ठाकरे राजकारण करत आहेत. गुजरातची प्रगती बघायला राज ठाकरे स्वत: गेले होते. मुंबईतील मराठी माणूस आणि मुंबईवर त्यांचे प्रेम नाही तर ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची आहे, अशी टीका महाजन यांनी केली. मुंबईत साधा एसटीपी प्लांट करु शकले नाहीत. इतकी वर्ष महापालिका सत्तेत असताना काहीच कामे केली नाहीत. आता आश्वासने देत आहेत, पण त्यांच्या हातात सत्ता गेली तर शिवसेना भवनाचा मॉल होऊ नये, असा टोला महाजन यांनी लगावला.

परळीमध्ये शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होती. सत्तास्थापनेसाठी त्यांनी गट स्थापन केला आहे, असे महाजन म्हणाले. छत्रपती संभाजी नगरात मुस्लिम कंत्राटदारांना कंत्राटे देणाऱ्या अंबादास दानवे यांनी केले. एमआयएमच्या मतांवर दानवे विधान परिषदेवर गेले होते, अशी टीका महाजन यांनी दानवेंवर केली.

Maharashtra Politics : “कितीही भाग आले तरी मुंबईत महापौर महायुतीचाच; मंगल प्रभात लोढांचा ठाकरें बंधूंविरोधात आक्रमक पवित्रा

Web Title: How much brokerage did you take to break the alliance and place ubathala in the maha vikas aghadi prakash mahajan fiercely criticized sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Prakash Mahajan
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Nilesh Rane : “गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा”, शिवसेना आमदार निलेश राणे यांची मागणी
1

Nilesh Rane : “गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा”, शिवसेना आमदार निलेश राणे यांची मागणी

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
2

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका
3

Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
4

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.