Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP Election: पुणे जिल्ह्याचा ‘कौल’ कुणाला? ७३ जिल्हा परिषद जागांसाठी मतमोजणी, बारामतीकडे सर्वांचे लक्ष

या निवडणुकीत पक्षीय समीकरणे, स्थानिक प्रश्न आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निकालाचा परिणाम केवळ जिल्ह्यावरच नव्हे, तर आगामी काळातील राज्याच्या राजकारणावरही होणार आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 09, 2026 | 09:13 AM
Pune ZP Election: पुणे जिल्ह्याचा ‘कौल’ कुणाला? ७३ जिल्हा परिषद जागांसाठी मतमोजणी, बारामतीकडे सर्वांचे लक्ष
Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी मतदान
  • पुणे जिल्ह्यात सरासरी ६८.८९ टक्के मतदानाची नोंद
  • बारामतीमधील निवडणूक राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा विषय
Pune ZP Election : पुणे जिल्ह्यातील मिनी मंत्रालयाचा म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज ( 9 जानेवारी) जाहीर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी झालेल्या या मतदानानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात कोणाचे वर्चस्व राहणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

यंदा पुणे जिल्ह्यात सरासरी ६८.८९ टक्के मतदान नोंदवण्यात आले असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का काहीसा घटला आहे. विशेषतः बारामतीमधील निवडणूक राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. बारामतीमध्ये ५४.९० टक्के इतके निचांकी मतदान झाल्याने, या उदासीनतेचा फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाला होणार, यावर आता गणिते मांडली जात आहेत. मावळ, भोर, शिरूर आणि खेड यांसारख्या तालुक्यांमध्ये मात्र मतदारांनी मतदानाचा उत्साह दाखवत मोठा प्रतिसाद दिला आहे.

Election Result : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींचे निकाल आज; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

या निवडणुकीत पक्षीय समीकरणे, स्थानिक प्रश्न आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निकालाचा परिणाम केवळ जिल्ह्यावरच नव्हे, तर आगामी काळातील राज्याच्या राजकारणावरही होणार आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, दुपारपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपली पकड मजबूत ठेवणार की शिवसेना-भाजप युती सत्तेची नवी समीकरणे मांडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात मोठे राजकीय फेरबदल झाले आहेत. अनेक ठिकाणी उदयाला आलेल्या नव्या नेतृत्वामुळे यंदाचा निकाल चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे.

चक्क ढाब्यावर दिसून आल्या ईव्हीएम मशीन; राष्ट्रवादीसह शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक

यंदाच्या प्रचारात ग्रामीण भागातील पाणीटंचाई, खराब रस्ते, आरोग्य सुविधा आणि रोजगाराचे प्रश्न केंद्रस्थानी राहिले. मात्र, प्रत्यक्ष मैदानात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक गटबाजी, नेत्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा आणि व्यक्तीकेंद्रित लढतीच निर्णायक ठरल्याचे दिसून येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या सभांऐवजी उमेदवारांनी थेट मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिल्याने निकालाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

याशिवाय जिल्ह्यात कोणाला स्पष्ट बहुमत मिळणार की सत्तेसाठी त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊन नवीन आघाडी आकाराला येणार, याचाही फैसला आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. जिल्ह्याच्या सत्तेची चावी पुन्हा कोणाकडे जाते, यावर पुणे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.

Web Title: Who will win the mandate in pune district vote counting for 73 zilla parishad seats underway all eyes on baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:09 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.