Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar PC: राधाकृष्णन यांना महाविकास आघाडी पाठिंबा का देणार नाही….? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

१८ ऑक्टोबर २०२४ला आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहीलं होत. आणि पत्रकार परिषदही घेतली होती. तुमचे सर्व्हर मॅनेज केले जात आहेत. जे काँग्रेस शिवसेनेचे, मतदार आहेत, ते १०-१० हजार मतदार बाहेर फेकले जात आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 22, 2025 | 05:48 PM
Sharad Pawar PC: राधाकृष्णन यांना महाविकास आघाडी पाठिंबा का देणार नाही….? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Follow Us
Close
Follow Us:

Sharad Pawar On CP Radhakrushnan:   महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला फोन केला होता, पण आम्ही पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. हेमंत सोरेन यांना ज्यावेळी रांचीच्या राजभवनात अटक करण्यात आली, त्यावेळी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते. सोरेन यांनी आपल्याला राजभवनात अटक न करण्याची विनंती केली होती. पण त्यानंतरही त्यांना राजभवनातच अटक कऱण्यात आली. त्यामुळेच आम्ही राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार नाही, असं कारणही यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आयोगावर निशाणा साधला. तसेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही वक्तव्य केले. इंडिया आघाडीकडे मतांची संख्या जास्त आहे. पण आम्ही चौकटीच्या बाहेर जाणार नाही. आमची ताकद किती आहे, याबाबत आम्हाला माहिती आहे. आमच्याकडे मते कमी असले तरी आम्ही नुसते उद्योग करणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

Ganesh Naik News: पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..: ठाण्यातून गणेश नाईकांचा इशारा

मतदार यादीत एकाच घरात १८८-२०० मतदार- जयंत पाटील

निवडणूक आयोगावर झालेल्या आरोपांविरोधात आम्ही ३०० खासदार रस्त्यावर उतरलो, पण तिथेही आमच्या खासदारांना अटक करण्यात आली. पण आता आम्हीही मतदार याद्यांचा अभ्यास सुरू केला आहे. पण बिहार हे राजकीयदृष्ट्या जागृत राज्य आहे. बिहारमध्ये राहुल गांधींच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, माझ्याकडे एक मतदारसंघ आहे, त्यात शुन्य हाऊस नंबर आहे, डॅश असलेली शेकडो घरे आहेत, उद्गारवाचक चिन्ह, डॉट असलेले, ब्लॅंक हाऊसनंबर असलेली, तीस-तीस, चाळीस-चाळीस हजार घरे अशी आहेत. त्यामुळे एका घरात १८८ नावे २०० नावे आहेत. यातही ०० ही एक कॅटेगिरी, ००० ही एक कॅटेगिरी आहे. कॉम्प्युटरमध्ये काहीतरी फिल करायचं म्हणून तिथे डॉट, कॉमा सारखी चिन्हे वापरली गेली आहे.

क्रीडा मंत्रालयाकडून नवीन नियमावली! रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; घ्याव्या लागणार निवडणुका

मतदार यादीतील घोळाबाबत निवडणुकीपूर्वीच आयोगाला पत्र- जितेंद्र आव्हाड

आमचे अशोक पवार यांनी निवडणुकीपूर्वी १० दिवस आधी कलेक्टरला सांगितलं होत. त्यांच्या मतदारसंघात बरीच नावनोंदणी सुरू आह. त्यातील अनेक नावे बोगस आहेत. तर आता आम्ही काहीच करून शकत नाही, असं कलेक्टरने त्यांना सांगितलं होत.त्यावर कारवाई करण्यास वेळ नाही. पण निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नाव घुसडण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानेच केली आहे. आता एकाच घरात  १६४-1१८८  मते आहेत.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, १८ ऑक्टोबर २०२४ला आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहीलं होत. आणि पत्रकार परिषदही घेतली होती. तुमचे सर्व्हर मॅनेज केले जात आहेत. जे काँग्रेस शिवसेनेचे, मतदार आहेत, ते १०-१० हजार मतदार बाहेर फेकले जात आहेत. त्यांच्या जागी नवीन मतदार आणले जात आहेत. हे पत्र आम्ही निवडणूक आयोगाला१८ ऑक्टोबर २०२४ला दिले होते. मतदार याद्यांमध्ये घोळ कऱण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि प्रत्येक मतदारसंघात १० ते १५ हजार मतदारांमध्ये हा घोळ सुरू आहे. ही तक्रार आम्ही निवडणुकीच्या नंतर नाही तर आधीच केली होती.

Web Title: Why does radhakrishnan not have the support of maha vikas aghadi sharad pawar clearly stated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Vice President Election 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फडणवीसांनी केली पवारांना आणि ठाकरेंना फोनवरून विनंती
1

Vice President Election 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फडणवीसांनी केली पवारांना आणि ठाकरेंना फोनवरून विनंती

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
2

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

‘मी ज्या वसंतदादांचे सरकार पाडले, त्यांनीच..’; शरद पवारांची जाहीर कबूली, तेव्हाची परिस्थितीही सांगितली
3

‘मी ज्या वसंतदादांचे सरकार पाडले, त्यांनीच..’; शरद पवारांची जाहीर कबूली, तेव्हाची परिस्थितीही सांगितली

इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे
4

इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.