Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vice President Election 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फडणवीसांनी केली पवारांना आणि ठाकरेंना फोनवरून विनंती

Vice President Election 2025: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीअध्यक्ष शरद पवार यांना फोन करून एनडीए उमेदवाराला पाठिंबा मागितला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 21, 2025 | 08:00 PM
Vice President Election 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फडणवीसांनी केली पवारांना आणि ठाकरेंना फोनवरून विनंती
Follow Us
Close
Follow Us:

Vice President Election 2025: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पदाची निवडणूक (Vice President Election) जाहीर झाली आहे. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

फडणवीसांचा पवारांना आणि ठाकरेंना थेट फोन

भाजपची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यांनी एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी राधाकृष्णन यांचा संबंध महाराष्ट्राशी असल्याने, राज्यातील सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार रिंगणात

एकीकडे भाजप बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न करत असतानाच, दुसरीकडे काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीने आपले उमेदवार उभे करून ही लढत रंजक बनवली आहे. विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना संयुक्त उमेदवार म्हणून घोषित केले आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रेड्डी यांनी संसदेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विरोधी पक्षांनी आपली एकजूट दाखवली.

Maharashtra: CM Devendra Fadnavis seeks support from NCP (SP) chief Sharad Pawar and Shiv Sena (UBT) president Uddhav Thackeray for NDA candidate C.P. Radhakrishnan in the upcoming Vice-Presidential elections.#Maharashtra #DevendraFadnavis #SharadPawar #UddhavThackeray pic.twitter.com/bzT8XEQL9u — Lokmat Times Nagpur (@LokmatTimes_ngp) August 21, 2025


शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट

शरद पवार यांनी ट्वीट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “ही लढाई संविधान आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आहे. उपराष्ट्रपती पदासाठी ‘इंडिया’ आघाडीचे संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी, ज्यांना लोकशाही मूल्यांवर गाढ विश्वास आहे, तेच या पदाला न्याय देतील,” असे त्यांनी म्हटले आहे.

आज लोकसभा विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी, राज्यसभा विरोधी पक्षनेते श्री. मल्लिकार्जुन खर्गे व इंडिया आघाडीतील पक्षातील प्रमुख नेत्यांसह ‘उपराष्ट्रपती’पदाचे विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी ह्यांचा उमेदवारी अर्ज दाखल… pic.twitter.com/aKna5w48Wf — Sharad Pawar (@PawarSpeaks) August 21, 2025


त्याचप्रमाणे, खासदार संजय राऊत यांनीही रेड्डी यांच्या उमेदवारी अर्जावेळी काढलेले छायाचित्र ट्वीट केले आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोन्ही गट ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारासोबत आहेत. आता उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीत काय होतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Why did devendra fadnavis call sharad pawar uddhav thackeray what is the real issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 07:59 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • Sharad Pawar
  • Uddhav Thackarey
  • Vice President Election

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
1

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Tasgaon Politics : तासगावमध्ये राजकीय भूकंप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांची बंडखोरी
2

Tasgaon Politics : तासगावमध्ये राजकीय भूकंप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांची बंडखोरी

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
3

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार
4

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.