Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हणून एकनाथ शिंदेंनी फडणवीस, अजित पवारांसोबत जाणं टाळलं; या नेत्याने सांगितलं खरं कारण

फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र दिल्लीला गेले नाहीत. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 11, 2024 | 09:54 PM
म्हणून एकनाथ शिंदेंनी फडणवीस, अजित पवारांसोबत जाणं टाळलं; या नेत्याने सांगितलं खरं कारण

म्हणून एकनाथ शिंदेंनी फडणवीस, अजित पवारांसोबत जाणं टाळलं; या नेत्याने सांगितलं खरं कारण

Follow Us
Close
Follow Us:

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी मुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले आहेत. महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार असून त्यानंतर मंत्रि‍पदाची नावं निश्चित होतील, अशी चर्चा होती. फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र दिल्लीला गेले नाहीत. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राज्यात उलट सुलट चर्चा सुरू असताना, शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांचं दिल्लीला जाण्याचं कोणतंही नियोजन नव्हतं. मंत्रिपदासाठी आमची यादी आधीच तयार असल्याने आम्हाला कुठेही जाण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपाची यादी दिल्लीत ठरते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले असतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात काही निर्णय बाकी असेल, त्यामुळे ते गेले असतील, असंही ते म्हणाले.

शिवसेनेत कोणीही नाराज असण्याच काही कारण नाही. कारण शिवसेनेत कोणाला मंत्री पदाची संधी मिळते, हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपावलेला आहे. ते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमच्याकडे अडीच वर्षांचा कोणताही फॅामुर्ला ठरलेला नाही. तसंच 13-14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. खात्यावरुन तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. इतर कोणालाही या बद्दल माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात महायुतीच्या तीनही नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. 14 डिसेंबर रोजी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

महायुतीत सरकारचा शपथविधी होऊन जवळपास आठवडा उलटला आहे. तरीही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातचा निर्णय झाला नाही. कोणत्या पक्षाला किती खाती मिळतील  याचं गणित अद्याप समोर आलेलं नाही. मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्यांना संधी देण्यात यावी, कोणत्या पक्षाला किती खाती दिली गेली पाहिजे. बाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्ष श्रेष्ठींसोबत दिल्ली बैठक होत आहे.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना गृहमंत्रालय त्यांच्याकडे होतं. आता एकनाथ शिंदे गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे गृह विभागाची जबाबदारी द्यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. पण, भाजप शिवसेनेला गृहखाते देण्यास तयार नसल्याचं सांगितलं जात आहे.

Web Title: Why eknath shinde did not go to delhi with cm devendra fadnavis ajit pawar sanjay shirsat explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 08:44 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde

संबंधित बातम्या

निकाल येईपर्यंत कुणाल कामराला होणार नाही अटक; मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती!
1

निकाल येईपर्यंत कुणाल कामराला होणार नाही अटक; मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती!

कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयाचा ठोठावला दरवाजा, काय आहे नेमकं कारण?
2

कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयाचा ठोठावला दरवाजा, काय आहे नेमकं कारण?

Kunal Kamra Parody Controversy : कॉमेडीचा बदलता चेहरा कुणाल कामराच्या पॅरोडीने राजकारणात खळबळ
3

Kunal Kamra Parody Controversy : कॉमेडीचा बदलता चेहरा कुणाल कामराच्या पॅरोडीने राजकारणात खळबळ

‘हम होंगे कंगाल एक दिन…’, कुणाल कामराचा आणखी एक Video चर्चेत, स्टुडिओ तोडफोडीवर दिले चोख प्रत्युत्तर!
4

‘हम होंगे कंगाल एक दिन…’, कुणाल कामराचा आणखी एक Video चर्चेत, स्टुडिओ तोडफोडीवर दिले चोख प्रत्युत्तर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.