NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच घडामोडी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे ही चर्चा सुरू झाली होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि यांनी शरद पवार यांच्यासोबत एकत्र येण्याच्या कोणत्याही चर्चा झाल्या नाहीत आणि तशा चर्चाही सुरू नसल्याचे सांगितले. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार का, या प्रश्नाचे उत्तर अद्याप अनिश्चितच असून, ते आणखी लांबणीवर गेले आहे. मात्र, याच दरम्यान शरद पवार गटात संघटनात्मक फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे.”
दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. पक्षातील सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत या संदर्भातील चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसांत या बदलांची अधिकृत घोषणा होईल.
वसई विरारमध्ये ED ची मोठी कारवाई; बेकायदेशीर इमारतीप्रकरणी १३ ठिकाणी छापेमारी
पक्षातील युवा नेते रोहित पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या फेरबदलांमध्ये त्यांची मर्जी किती विचारात घेतली जाणार , याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, ज्यांना नुकतेच फ्रंटल सेलच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती, त्यांनाही हटवले जाणार की पुन्हा संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षातील या हालचाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असल्याचे स्पष्ट होत असून, नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला जात असल्याचे संकेतही मिळत आहेत.
गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)मध्ये आमदार रोहित पवार यांना डावलले जात असल्याचे संकेत मिळत होते. त्यांनीही वेळोवेळी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षात होऊ घातलेल्या संघटनात्मक फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या जबाबदाऱ्यांची मांडणी करताना रोहित पवार यांच्या खांद्यावर पक्षात महत्त्वाची भूमिका सोपवली जाते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये युवा नेतृत्वाला पुढे आणण्याच्या दृष्टीने या बदलांकडे पाहिले जात आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) काही आमदारांमध्ये पुन्हा एकत्र येण्याची चर्चा रंगू लागली असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका पक्षांतर्गत बैठकीत अजित पवारांनी आपल्या गटातील आमदारांशी संवाद साधताना सांगितले की, “सध्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा सुरु नाही.”
या बैठकीत अजित पवारांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गटातील काही आमदारांना दोन्ही गटांनी एकत्र यावे, असे वाटत आहे. त्यामुळे पक्षातील गळती थांबवण्याच्या उद्देशानेच शरद पवारांकडून काही वक्तव्यं केली जात असावीत, असेही अजित पवार यांनी नमूद केले. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या दोन गटांतील सध्या असलेले संबंध आणि भविष्यातील शक्यता यासंदर्भात नव्या चर्चांना उधाण आले आहे.