Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा

शेती किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने शेतकरी प्रमाणपत्र पोर्टल सुरू केलं आहे. सातबारा नावावर नसला तरी पात्र महिलांना प्रमाणपत्र मिळणार असून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 17, 2026 | 09:58 PM
Dattatray Bharne

Dattatray Bharne

Follow Us
Follow Us:
  • सातबारा नावावर नसलेल्या महिलांसाठी शेतकरी प्रमाणपत्राची सुविधा.
  • प्रमाणपत्राच्या आधारे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार.
  • दुष्काळी परिस्थितीवर सरकारकडून आढावा आणि मदतीचं आश्वासन.
 

मुंबई : शेतीची धुरा सांभाळणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारकडून मोठी बातमी समोर आली आहे. शेतीच्या सातबाऱ्यावर नाव नसल्यामुळे अनेक महिलांना सरकारी पातळीवर ‘शेतकरी’ म्हणून ओळख मिळत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी आता शेतकरी प्रमाणपत्र पोर्टल सुरू करण्यात आलं असून, शेती किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या महिलांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

देशात अनेक ठिकाणी शेतीचा सातबारा पुरुषांच्या नावावर असतो. मात्र प्रत्यक्षात शेतीची अनेक कामं महिला सांभाळतात. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेताना त्यांच्यासमोर कागदपत्रांची अडचण उभी राहते. आता शेतकरी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ही कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या प्रमाणपत्राच्या आधारे पात्र महिला शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे शेतीत प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या महिलांना सरकारी योजनांशी जोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

दरम्यान, राज्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मराठवाड्यासह काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. यावर कृषीमंत्री भरणे यांनी कृषी आणि महसूल विभागाकडून परिस्थितीची माहिती घेतली जाईल, असं स्पष्ट केलं.

‘राज्यातला शेतकरी अडचणीत आहे,’ असं सांगत भरणे यांनी स्वतः पाच-सहा जिल्ह्यांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं सांगितलं. गरज पडल्यास चारा छावण्यांबाबतही विचार केला जाईल. पशुधन आणि दुग्ध व्यवसायाबाबत दिवाळीच्या आसपास निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा 56 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं. या योजनेसाठी सुमारे 40 हजार 885 कोटी रुपयांची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. 50 हजार रुपयांच्या अनुदानाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दुसरीकडे, लातूरच्या उदगीर तालुक्यात शेतकरी संघटनांनी दुष्काळाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केलं. कोरडा दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, संपूर्ण कर्जमाफी करावी आणि पीकविमा योजनेतील काही बाबी पुन्हा समाविष्ट कराव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

PM Modi Birthday : पियूष गोयलांचा ‘सेवा’चा संकल्प; उत्तर मुंबईत 100 सुविधा केंद्रांसह ओपन जिमची घोषणा

Web Title: Women farmers certificate maharashtra dattatray bharne farmer drought loan waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • Dattatray Bharne
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी
1

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी

Jaykumar Rawal : ‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन
2

Jaykumar Rawal : ‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन

Maharashtra Cabinet Meeting : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय
3

Maharashtra Cabinet Meeting : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
4

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.