अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
रायगड जिलह्यातील दिवेआगर (ता.श्रीवर्धन) येथे होणाऱ्या प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची सुपारीची रोपे मिळून या भागाला त्याचा चांगला फायदा होईल, असे मंत्री भरणे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा हा सागर तटीय जिल्हा असून येथे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षीत आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तांत्रिक दृष्टया प्रशिक्षीत आणि व्यावसायिक पदवीधरांसाठी महाविद्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे.
कृषिमंत्री नवीन काय म्हणाले तर वाकडी कामं पण सरळ करावी लागतात. यांनी-त्यांनी महाराष्ट्राची तिजोरी वेडीवाकडी केली आहे. वाकड्यात काम करण्यासाठी कृषिमंत्री पद दिलं नाही.
कृषी खात्याचा कारभार आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पदभार स्वीकारताच भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंदापूरच्या विकासाचा शब्द दिला आहे.
नवभारत नवराष्ट्र समुहाच्या वतीने, शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा नवराष्ट्र गर्व्हनर्स अवॉर्ड २०२५ देऊन दत्तात्रय भरणे व पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुंडकुलवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
काटेवाडी मध्ये आगमन झाल्यानंतर मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. काटेवाडीतील विसाव्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर काटेवाडी बस स्थानकाजवळ पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात रंगले.
अद्ययावत जिम्नॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन बिल्डींग अशा सुविधा उपलब्ध करून क्रीडा सुविधांचे “नागपूर स्पोर्ट्स हब" उभारण्यात येत आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पुरंदर तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवारी रात्री पासूनच शिवभक्त मोठ्या संख्येने शिवज्योत घेवून मोठ्या किल्ले पुरंदर येथे दाखल होत होते.
Ajit Pawar Vs Chandrkant Patil: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकात पाटील यांच्यात पालकमंत्रीपदासाठी शर्यत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पालकमंत्री पदावरून नाराजीनाट्य पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर आजित पवार गटाचे नेते आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते काही लोकांना अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ करत आहेत.
इंदापूर तालुक्यामधील २५१५ योजनेमधील सुमारे ८ कोटी ५ लाख रुपये निधीच्या एकूण ३४ कामांवरील स्थगिती उठवण्यात आल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी (दि.२९) दिली.
गेल्या काही वर्षात तालुक्यातील असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने ठिकठिकाणी अभ्यासिका बांधण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांनी तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेवून आपले ध्येय गाठण्याची गरज…
मिळालेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी केल्यास, समाज निश्चित दखल घेतो, त्यामुळे सरपंच व उपसरपंच यांनी गावचा विकास आराखडा तयार करून गावचा सर्वांगीण विकास करावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे…
जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 मधील सर्वसाधारण योजनेसाठी 527 कोटी, अनुसूचित जाती योजनेसाठी 151 कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आदिवासीसाठी योजना यासाठी 4.28 कोटी असे एकूण 682.28 कोटी निधी अर्थसंकल्पीत…
अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहिम हाती घेतली असून, महसूल पथकाने भीमा नदीपात्रातील अहिल्या पुलाखाली अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ९ होड्यांंची तोडफोड करून…